
Raksha Bandhan Marathi Messages: दुनियेत असलेल्या सर्व नात्यांमधील निरागस, गोड असं नातं ज्यात प्रेम, राग, भांडणं, थट्टा-मस्करी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांबद्दल खूप काळजी आहे असं पवित्र नातं म्हणजे भाऊ-बहिणीचे (Brother-Sister) नाते. या नात्याला अबाधित ठेवणारा सण म्हणजे श्रावणात येणारा रक्षाबंधन! या सणाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि ओवाळणी म्हणून भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण कऱण्याचे वचन देतो. यंदा कोरोना व्हायरस मुळे सावट या सणावर आल्यामुळे आपल्यापासून दूर असलेल्या भावाला मेसेजेसच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.
यासाठी तुम्हाला गरज असेल ती चांगल्या मराठमोळ्या संदेशाची! असे शुभेच्छा संदेश ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा पाठवू शकता.
बंध प्रेमाचा
बंध निरागस नात्याचा
बंध एकमेकांवर दाखविलेल्या विश्वासाचा
भाऊ-बहिण हे गोड नाते जपण्याचा
असा सण आला रक्षाबंधनाचा!
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

हेदेखी वाचा- Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन सणाला भावासाठी घरच्या घरी कशा बनवाल राखी? (Watch Video)
पुन्हा मांडू भातुकली अन्
पुन्हा खेळ खेळू रडीचा
सण हा भाऊ-बहिणीतील निरागस नात्याचा
जगा दाखवू भाव मनीचा
रक्षाबंधनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे भावा-बहिणीचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधन एक पवित्र सण आहे
सगळीकडे आनंदी आनंद आहे
बंध एका धाग्यामध्ये
ज्यात भावा-बहिणीचे अतूट प्रेम आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

काही नाती खूप अनमोल असतात
ज्यात बालपणीच्या आठवणी साठवल्या असतात
प्रेम, भांडण, मजा मस्करी सर्व गोष्टी त्यात असतात
अशा या गोड नात्याला भाऊ बहिणीचे नाते म्हणतात
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

राखीचा धागा हा केवळ एक सुती धागा नसून ते एक शांततेचे, स्नेह, आपुलकी, प्रेम आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे. अशा या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा!