DIY Rakhi Ideas: महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू झाला की सणांची धामधूम सुरू होते. यंदा नागपंचमी पाठोपाठ येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षा बंधन. बहीण-भावाचं नातं दृढ करणारा सण 3 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. सध्या मुंबई, पुणे, ठाणे सह देशभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. अशामध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यंत गरजेचे असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे. कळत- नकळत या नियमांचा सण-समारंभांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रक्षााबंंधनात विशेष महत्त्व असलेल्या राखीच्या खरेदीसाठी अनेकांना घराबाहेर पडता येणार नाही. पण त्याचा तुमच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनवर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर तुमच्या भावासाठी आकर्षक राख्या तुम्ही घरी देखील बनवू शकता.
थोडा वेळ आणि क्रिएव्हिटी दाखवली तर राख्या झटपट घरी देखील बनवता येऊ शकतात. तुम्हांला युट्युबवर देखील राख्या घरच्या घरी कशा बनवायच्या याचे अनेक व्हिडिओज मदत करू शकतात. दरम्यान बेबी वूलन, रेशमी धागा, सजावटीसाठी काही मोती, डायमंड्स यांच्या मदतीने सहज सोप्या पद्धतीने राख्या बनवल्या जाऊ शकतात. मग यंदा तुम्ही देखील असा प्रयत्न करणार असाल तर पहा हे व्हिडिओज
घरच्या घरी राख्या कशा बनवाल?
सिल्क राखी
रक्षा बंधन हा सण बहिण -भावाच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आहे. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या बदल्यात तिचं रक्षण करण्याचं वचन घेते. राखीचा धागा भावाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देते. यंदा जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असल्याने अनेक जण व्हर्च्युअली रक्षाबंधन साजरी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.