Raksha Bandhan 2020: रक्षा बंंधन निमित्त भाऊराया साठी घरगुती सामानापासुन बनवा DIY राखी, इथे पाहा सोप्पी पद्धत (Watch Video)
Raksha Bandhan 2020 DIY Rakhi (Photo Credits: File Image)

DIY Rakhi Ideas: कोरोना व्हायरसला (Coronavirus) रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन (Lockdown) लागु करण्यात आले आहे, यामुळे मागील चार महिन्यात व आता येत्या प्रत्येक सणावर परिणाम होत आहे, उद्या म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी नारळी पोर्णिमा (Narali Purnima) व रक्षााबंंधनाचा (Rakshabandhan) सण साजरा होणार आहे. अशावेळी राखीच्या खरेदीसाठी अनेकांना घराबाहेर पडता येणार नाही. पडुही नका. पण या कारणाने तुमच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनवर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर तुमच्या भावासाठी आकर्षक राख्या तुम्ही घरी देखील बनवू शकता. यासाठी अगदी काही तुम्ही एक्सपर्ट असण्याची गरज नाही, थोडीशी क्रिएटिव्हिटी आणि अगदी घरात उपलब्ध असणार्‍या सामानापासुन तुम्ही राखी बनवु शकाल. अशाच काही झटपट बनणार्‍या क्रिएटिव्ह DIY राखी (Rakhi) कशा बनवायच्या याचे सोप्पे व्हिडिओ पाहा.

बेबी वूलन, रेशमी धागा, सजावटीसाठी काही मोती, डायमंड्स यांच्या मदतीने सहज सोप्या पद्धतीने राख्या बनवल्या जाऊ शकतात. याचे व्हिडिओज तुम्ही Youtube सहित सोशल मीडियावर शोधु शकता. अगदी मणी, खडे वापरुन राखी बनवायची नसेल तर घरातल्याच डाळ,तांंदुळ, टूथपिक सारख्या वस्तुंंचा वापर करुन राखी बनवायचा पर्याय सुद्धा तुम्ही विचारात घेउ शकता.

DIY Rakhi With Household Items

दरम्यान, यंदा कोरोनामुळे तुम्ही तुमच्या बहीण भावाला भेटु शकत नसाल तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातुन रक्षाबंधन करण्याचा विचार करु शकता, अखेरीस प्रेम महत्वाचं, हो ना?