 
                                                                 आज 6 मे. राजर्षी शाहू महाराज छत्रपती (Rajarshi Shahu Maharaj Chhatrapati) यांची पुण्यतिथी. एक दृष्टा विचारवंत, थोर समाजसुधारक आणि एकूणच सामाजिक उन्नतीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिमत्वाचे स्मरण करण्याचा दिवस. कोल्हापूर आणि कोल्हापूर संस्थानामध्ये उभारलेल्या संस्था, धरणे, शेतकरी चळवळी, आजही शाहू महाराजांच्या दृष्ट्या विचारांची साक्ष देतात. भारतावर ब्रिटिशांचे राज्य असतानाही सर्वासामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, समाज परिवर्तनासाठी मोठे कार्य केले. अशा महान व्यक्तिमत्वाच्या पुण्यतिथिनिमित्त आपण त्याचे HD Images, Wallpapers मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटस म्हणून ठेऊ शकता. Rajarshi Shahu Maharaj Chhatrapati HD Images, Wallpapers तुम्हाला इथे उपलब्ध आहेत.
शाहू महाराजांचा जन्म इ.स. 26 जून 1874 या दिवशी झाला. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत. तर त्यांच्या वडीलांचे नाव जयसिंगराव आणि आईचे नाव राधाबाई होते. वडिलांना सर्व लोक आदराने आप्पासाहेब म्हणत. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 या दिवशी दत्तक घेतले आणि त्यांचे नाव 'शाहू' असे ठेवले.


शाहू महाराजांचे शिक्षण प्रसारावर विशेष प्रेम होते. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी विशेष राजाज्ञा काढली. जातीयता निर्मूलणासाठी, भटक्या विमुक्तांना त्यांचे अधिकार मिळण्यासाठी, दलित सवर्ण हा भेद मिटण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. (हेही वाचा, Happy Buddha Purnima 2020 Messages: बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, WhatsApp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करत साजरा करा गौतम बुद्धांचा जयंती सोहळा!)


Rajarshi Shahu Maharaj Chhatrapati Death Anniversary: राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी HD Images wallpaper - Watch Video
आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदाही शाहू महाराज यांनी संमत केला. विधवा पुनर्विवाहाचा कायदा करुन त्यांनी त्या विवाहाला कायदेशीर मान्यताही दिली. ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्थाही त्यांनी स्थापन केली. शाहू महाराज यांच्या काळात घडलेले वेदोक्त प्रकरण प्रचंड गाजले. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. 1922 सालापर्यंत म्हणजे 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे 6 मे 1922 रोजी त्यांचे निधन झाले
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
