
Buddha Purnima 2020 Marathi Messages: यंदा 7 मे रोजी बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध (Gautam Buddha) यांची जयंती पार पडणार आहे, हा दिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून सुद्धा ओळखला जातो. बुद्धांचे विचार आत्मसात करून त्यांच्या स्मृतीस खऱ्या अर्थाने वंदन करण्यासाठी हा दिवस एक सुरुवात ठरू शकतो. दरवर्षी यानिमित्त मोठे सोहळे पार पडतात मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून बुद्ध पौर्णिमा साजरी करावी लागणार आहे. यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला खास बनवण्यासाठी या मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, WhatsApp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर मित्र, नातेवाईक व कुटुंबासोबत शेअर करू शकता. Buddha Purnima 2020: यंदा 7 मे रोजी साजरी होणार बुद्ध जयंती; यानिमित्ताने भगवान गौतम बुद्ध यांच्या आयुष्याविषयी रोचक माहिती जाणून घ्या
इ.स.पू. 563 मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला.या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. त्यांचा सांभाळ करणाऱ्या मावशीच्या अनाव्रुन त्यांना गौतम म्ह्णूनही ओळखले जात होते. पुढे गृहत्याग करून ज्ञानप्राप्ती केली असता त्यांना बुद्ध ही पदवी देण्यात आली. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापन व प्रसार केला आज भारताशिवाय जगभरात बौद्ध धर्माचे अनेक उपासक आहेत. त्यांच्या शिकवणीला, विचारांना, ज्ञानाला उजाळा देण्यासाठी 'बौद्ध पौर्णिमा' साजरी केली जाते. Happy Buddha Purnima 2020 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी Messages, Greetings, GIFs, HD Images च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून साजरा करा यंदा गौतम बुद्धांचा जन्मदिवस!
बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनी
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या
आयुष्यातले दुःख नाहीसे करून
सुख शांती आणि समाधान घेऊन येवो
व हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार देवुन जावो,
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त
गौतम बुद्धांच्या स्मृतीस त्रिवार वंदन!

Buddha Purnima 2020 Wishes: बुद्ध जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा ग्रिटिंग्स, SMS, Messages, Images - Watch Video
भारताप्रमाणे नेपाळ, चीन, जपान, लायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोलिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया अशा अनेक देशात बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी केली जाते. यंदाचा हा सण गौतम बुद्धांचे विचार तुमच्या आयुष्यात घेऊन येवो. या दिवसाच्या समस्त बौद्ध बांधवांना खूप खूप शुभेच्छा!