Buddha Purnima 2020 | File Image

Buddha Jayanti 2020 Wishes: भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर करणारे आजही शांततेचा मार्ग निवडतात. बौद्ध धर्मीयांसाठी वैशाख पौर्णिमेचा (Vaishakh Purnima) दिवस हा खास असतो. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बौद्ध यांचा जन्म आणि निर्वाण दिन्ही वैशाख पौर्णिमेदिवशीच झालं असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. यंदा बुद्ध जयंती (Buddha Jayanti) हा दिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, बौद्ध पौर्णिमा 7 मे दिवशी आहे. जगाला दया, क्षमा, शांती आणि संयमाची शिकवण देणारे गौतम बुद्ध (Gautam Buddha) आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांची शिकवण आज जगाला कठीण काळातही सामना करण्यासाठी बळ देते. मग यंदा बुद्ध पौर्णिमेदिवशी गौतम बुद्ध यांचे स्मरण करून तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स, मेसेज, Wishes, HD Images शेअर करून त्यांच्या विचारांना आजच्या दिवशी पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू या!  Buddha Purnima 2020 Messages: बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, WhatsApp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करत साजरा करा गौतम बुद्धांचा जयंती सोहळा!

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य म्हणून ओळखला जातो. गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हणून देखील ओळखले जाते.

बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा

Buddha Purnima 2020 | File Image

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे

दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे

विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती

निमित्त हार्दिक शुभेच्छ!

Buddha Purnima 2020 | File Image

नमो बुद्धाय !

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

Buddha Purnima 2020 | File Image

विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणार्‍या

भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!

Buddha Purnima 2020 | File Image

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

Buddha Purnima 2020 | File Image

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून सुख शांती आणि समाधान घेऊन येवो हीच आमची प्रार्थना...

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी GIFs

via GIPHY

via GIPHY

भारताप्रमाणेच बौद्ध धर्माची शिकवण आणि संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया या देशांमध्ये पाळली जाते. गौतम बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सामान्यांपर्यंत पोहचवले. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्यं, अष्टांग मार्ग व पंचशीले जगाला दिली आहेत.