Pithori Amavasya 2019: श्रावण अमावस्या दिवशी महिला पिठोरी अमावस्या व्रत का घेतात?
Pithori Amavasya (Photo Credits: Instagram)

Pithori Amavasya 2019 Vrat Puja Vidhi : व्रत वैकल्य आणि उपास-तापसांनी भरलेला श्रावण महिना हा पिठोरी अमावस्ये (Pithori Amavasya) दिवशी संपतो. पिठोरी अमावस्या हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण असतो. महाराष्ट्रात या दिवशी मातृदिन (Matru Din), बैल पोळा (Bail Pola) देखील साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्रामध्ये पिठोरी अमावस्या ही 29 ऑगस्ट दिवशी साजरी केली जाणार आहे. तर 30 ऑगस्टला बैल पोळा हा सण रंगेल. आई आणि तिच्या मुलांचं नातं जपणारा हा सण महिला पिठोरी अमावस्या व्रत घेऊन पूर्ण करतात. या दिवशी अतिथींचं स्वागत करण्यालाही विशेष महत्त्व आहे. Matru Din 2019: भारतामध्ये पिठोरी अमावस्या दिनी मातृदिन का साजरा केला जातो?

पिठोरी अमावस्या व्रत कसे करतात?

पिठोरी अमावस्या व्रतामध्ये चौसष्ठ योगिनी या पुजेच्या देवता मानल्या जातात.या दिवशी व्रत करणार्‍या महिला उपवास करतात. संध्याकाळी आठ कलशांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामध्ये ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा यांच्य मूर्तीची स्थापना केली जाते. तांदळाच्या राशीवर 64 सुपा-या मांडून त्यांचे आवाहन केले जाते. या चौसष्ठ योगिनी या मनुष्याच्या उपजीवेकेसाठी उपयुक्त अशा 64 कला आहेत. त्यांची ही प्रतिकं समजली जातात आणि पूजा होते. या दिवशी पिठाचे दिवे करुन पूजन करण्याच्या प्रथा असल्याने हा दिवस "पिठोरी अमावस्या" म्हणून ओळखला जातो.

पिठोरी अमावस्या व्रत कहाणी

पुराणातील कथे नुसार, श्रीधर आणि सुमित्रा या दांम्पत्याच्या सुनेला झालेली मुलं जगत नसतं. एका श्रावण अमावस्यादिनीदेखील त्यांना झालेले मूल मरण पावले. घरात श्राद्ध पाहून सासूने सुनेला बाहेर काढले. मृत बालकासह सून अरण्यात गेली. तिथे तिची एका देवीशी गाठा पडली. त्या देवतेने तिला आश्रमात राहण्याचा सल्ला दिला. त्या रात्री 64 योगिनी येऊन 'कोणी अतिथी आहे का?' असा प्रश्न विचारतील त्यावेळेस त्यांना शरण जाऊन नमस्कार कर, तुझे दु;ख सांग असा सल्ला दिला. त्यानुसार सुनेने सारी कहाणी झाल्यानंतर तिची मुलं पुन्हा जीवंत झाली.

पिठोरी अमावस्ये दिवशी पिठाचे दिवे केले जातात. नैवेद्यालाही पिठापासून बनवलेला एक गोडाचा पदार्थ असतो.