Bail Pola 2019 Wishes: आपले अन्नदाते शेतकरी बांधवांना Whatsapp Status, Greetings, Messages च्या माध्यमातून द्या बैल पोळा सणाच्या मराठमोळ्या शुभेच्छा
Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

श्रावणात येणा-या प्रत्येक सणाला विशेष असे महत्व आहे. त्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण म्हणजे 'बैल पोळा' (Bail Pola). हा सण संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. अन्नधान्य पिकविण्यासाठी आपल्या धन्यासोबत रात्रंदिवस राबणा-या, कष्ट करणा-या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. हा सण तिथीनुसार श्रावण अमावस्येला साजरा केला जातो.

या दिवशी बैलांना पूर्णपणे आराम दिला जातो. त्यांना औताला जुंपले जात नाही. त्यांना छान सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यांना गोड पुरणपोळी आण सुग्रास अन्नाचा नैवेद्यही दिला जातो. अशा या मुक्या जनावरांसह आपले अन्नदाते असलेले शेतकरी बांधव यांनाही या सणाच्या विशेष शुभेच्छा देण्यासाठी

पाहा खास मराठमोळ्या शुभेच्छा (Wishes)

Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

हेही वाचा- Bail Pola 2019: बैल पोळा सण महाराष्ट्रात श्रावण अमावस्या दिवशी साजरा करण्याचं महत्त्व काय? जाणून घ्या पूजा विधी आणि परंपरा

Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

Bail Pola Wishes (Photo Credits: File Image)

पाहा व्हिडीओ शुभेच्छा:

बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. त्यालाही बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी बैलांचा वाद्यांसहित मिरवणूक काढली जाते. या दिवशी बैलांना पाहुण्यांसारखे आमंत्रण करुन त्यांचा पाहुणाचार केला जातो. अशा या बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा