Matru Din 2019: भारतामध्ये पिठोरी अमावस्या दिनी मातृदिन का साजरा केला जातो?
Happy Mothers Day (File Photo)

Matru Din Significance: जगभरात मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' (Mothers Day) साजरा केला जातो. मात्र भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या म्हणजेच 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya)  दिवशी मातृदिन (Matru Din) साजरा केला जातो. या दिवशी आईच्या ऋणाची जाणीव ठेवत तिच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये आईला विशेष आणि सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस यंदा भारतामध्ये 29 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. 'सेलिब्रेशन' किंवा उठसुट 'डेज' साजरे करणं हे पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण असल्याचं म्हणत अशा प्रकारे 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' सेलिब्रेट करणं याबाबत समाजात मतमतांतरं आहेत पण पिठोरी अमावस्येदिवशी मातृदिन साजरा करण्याची परंपरा कशी सुरू झाली याची कहाणी तुम्हांला ठाऊक आहे का?

पिठोरी अमावस्येदिवशी मातृदिन का साजरा केला जातो?

पिठोरी अमावस्येदिवशी ज्या मातांची मुलं अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांना अपत्यप्राती होत नाही अशा महिला पिठोरी अमावस्या व्रत करतात. सामान्यतः बाळाच्या सुदृढ दीर्घायुष्यासाठी महिला पिठोरी अमावस्येदिवशी व्रत करतात म्हणून श्रावण महिन्यातील दर्श अमावस्या 'मातृदिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आईचा आशिर्वाद घेऊन तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा मदर्स डे!

पुराणातील कथे नुसार, श्रीधर आणि सुमित्रा या दांम्पत्याच्या सुनेला झालेली मुलं जगत नसतं. एका श्रावण अमावस्यादिनीदेखील त्यांना झालेले मूल मरण पावले. घरात श्राद्ध पाहून सासूने सुनेला बाहेर काढले. मृत बालकासह सून अरण्यात गेली. तिथे तिची एका देवीशी गाठा पडली. त्या देवतेने तिला आश्रमात राहण्याचा सल्ला दिला. त्या रात्री 64 योगिनी येऊन 'कोणी अतिथी आहे का?' असा प्रश्न विचारतील त्यावेळेस त्यांना शरण जाऊन नमस्कार कर, तुझे दु;ख सांग असा सल्ला दिला. त्यानुसार सुनेने सारी कहाणी झाल्यानंतर तिची मुलं पुन्हा जीवंत झाली.

आजही भारतीय संस्कृतीमध्ये आई जी जन्माची शिदोरी, ती उरत ही नाही आणि पुरत ही नाही अशीच आहे. तिच्या ऋणांमधून कधीच उतराई होऊ शकत नाही म्हणून आजच्या दिवशी आपल्याला या जगात घेऊन येणार्‍या त्या माऊलीला आपल्या कृतीमधून कृतज्ञता, आदर व्यक्त करून तिचे आशिर्वाद घ्या.