International Mother's Day 2019 Marathi Messages & Wishes: देवाचं दुसरं रूप म्हणजे आई असते. मुलांसाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अविरत काम करणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे आई! आईच्या ऋणांची परतफेड होऊच शकत नाही. परंतू किमान 'मदर्स डे'च्या (Mothers' Day) दिवशी आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदा मातृदिन 12 मे दिवशी जगभरात साजरा करण्यात आला. तुमचा प्रत्येक दिवस सुरक्षित जावा यासाठी आई कळत नकळत आई तुमच्यासोबत असते. पण मदर्स डेच्या दिवशी किमान ग्रिटिंग्स (Greetings), शुभेच्छा संदेश यांच्या माध्यामातून तिच्या अनकंडिशनल प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. यंदा मदर्स डेच्या दिवशी आईचा दिवस स्पेशल करायचा असेल तर ही मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, Quotes, Wishes, Images व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून शेअर करा.
मदर्स डे 2019 ग्रिटिंग्स आणि शुभेच्छा
आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई
'आई
तुझ्या चेहर्यावरील हास्य हे असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुंबईत घाई
शिर्डीत साई
फूलात जाई
गल्लीगल्लीत भाई
पण जगात भारी
केवळ आपली आई!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दु:खात हसवी, सुखात झुलवी,गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही,जशी माझी प्रिय आई
ठेच लागता माझ्या पायी,वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये,श्रेष्ठ मला मझी “आई”
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई ...
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई...
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
GIFs ग्रिटिंग्स
मदर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ
काम, ऑफिस, अभ्यास आणि आपलं फ्रेंड सर्कल यामध्येच व्यग्र असलेले आपण अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तींना गृहित धरतो. त्यामध्येही हक्काने रागावू शकू, मनातलं सारं सांगू शकू अशी व्यक्ती आई असते. मग यंदाच्या मदर्स डे दिवशी तुमच्या आईवर तुम्ही प्रेम करता हे देखील सांगायला विसरू नका!