Onam 2019: 'ओणम' चा सण केरळ वासियांसाठी का महत्वाचा मानला जातो? जाणून घ्या
Onam Festival (Photo Credits-Facebook)

Onam/Thiruvonam 2019: दक्षिण भारतामधील केरळ मध्ये ओणम सणाचे फार महत्व आहे. तर शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात 10 दिवस ओणमचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. ओणमच्या पहिल्या दिवसाला 'अथम' आणि शेवटच्या दिवसाला 'थिरुओणम' असे म्हटले जाते. यंदा ओणमचा सण येत्या 1 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2019 पर्यंत साजरा केला जातो. या दिवसात दक्षिण भारतीय महिला घराला फुलांनी सजवातात. असे म्हटले जाते की, थिरुओणम या दिवशी वर्षातून एकदा असुर राजा महाबली त्याच्या प्रजेला भेटण्यासाठी पाताळामधून धरतीवर अवरतो असे मानले जाते. त्यामुळेच राजाला खुश करण्यासाठी आंबट-गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. देवाला या पदार्थांचा नैवेद्य दाखवत सामूहिक रितीने त्याचे भोजन केले जाते.

केरळ वासियांसाठी ओणम हा महत्वपूर्ण पर्व असून याची धूम देशातील सर्व कानाकोपऱ्यात दिसून येते. सणादरम्यान मंदिरासह घरात पारंपारिक मान्यतानुसार पूजापाठ केला जातो. या महापर्वाच्या मागे एक ऐतिहासिक मान्यता सुद्धा आहे. राजा महाबली याच्या आदरार्थासाठी ओणम हा सण साजरा केला जातो. उत्तम शेती धान्यासाठी ओणम हा सण साजरा करण्याची मान्यता आहे. या महिन्यात केरळात हिरवळ प्रचंड दिसून येते. लोकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतो.(5 सहजसोप्या रांगोळी डिझाईन्स)

तसेच या सणावेळी घरात लज्जतदार पदार्थ बनवले जातात. ओणम सणाची परंपरा ही जुन्या काळापासून चालत आली आहे. तर ओणम वेळी केळीच्या पानात जेवण वाढले जाते. या दिवसात केरळवासिय एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणीत करताना दिसून येतात. ओणम सणावेळी नावस्पर्धा, नृत्य, संगीतस, महाभोज यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन ही केले जाते.