Navratri Kanya Pujan 2021 Gift Ideas: नवरात्री मध्ये कन्या पुजनाच्या दिवशी बालिकांना 'या' भेटवस्तू देऊन त्यांना करा खूष!
कन्या पूजन गिफ्ट । PC: PxHere and Pixabay)

भारतामध्ये नवरात्रीची धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्‍याला विजया दशमी साजरी केली जाते. आदिशक्तीचा जागर करण्याचा हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नवरात्रीमध्ये कुमारिकांना प्रामुख्याने 12 वर्षांखालील मुलींना घरी बोलावून कन्या पूजन ( Kanya Pujan ) करण्याची पद्धत आहे. या दिवशी त्यांना घरी बोलून त्यांचे पाय धुऊन त्यांचं पूजन केले जातं. यावेळी त्यांना शिरा-पुरी दिली जाते सोबतच एखादी भेटवस्तू देण्याची देखील पद्धत आहे. यंदा कन्या पूजनाच्या दिवशी तुमच्या घरी देखील हा सण साजरा करणार असाल तर त्यांना भेटवस्तूच्या रूपात कोणत्या वस्तू देऊ शकता हे देखील जाणून घ्या. नक्की वाचा: Navratri 2021 Rangoli Designs: नवरात्रीच्या 9 शुभ दिवशी काढा या सोप्या आणि सुंदर डिझाईन.

कन्या पूजन भेटवस्तू

आकर्षक मास्क, सॅनिटायझर

अद्याप कोरोनाचं संकट संपूर्णपणे टळलेले नाही त्यामुळे मुलांमध्ये याबाबतची सजगता कायम ठेवण्यासाठी लहान मुलींसाठी आकर्षक मास्क बनवून देऊ शकता. वारंवार हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझर देखील देऊ शकता.

सीपर

आजकाल पाण्याच्या सीपर साठी अनेक आकर्षक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. मुलांना नियमित पाणी पिण्याची सवय लावण्यासाठी हे सीपर फायदेशीर ठरू शकतात.

स्लिंग बॅग

आजकाल छोट्या कारणासाठी बाहेर पडायचं म्हणजे तुमच्या तोंडावर मास्क आणि हातात सॅनिटायझर हवंच मग या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी एक लहानशी स्लिंग बॅग आता प्रत्येकीची गरज झाली आहे.

मंडेला आर्ट बूक

लहान मुलं म्हणजे चंचलपणा आलाच पण त्यांची एकाग्रता वाढवायची असेल तर डूडल करणं किंवा मंडेला आर्ट करणं हा एक उत्तम पर्याय आहे. आजकाल मुलं बराच वेळ घरी असतात अशा वेळी त्यांच्या वेळेला क्रिएटिव्हीटी मध्ये बदलण्यासाठी मंडेला आर्ट बूक देखील उत्तम पर्याय आहे.

अ‍ॅक्सेसरी

मुली म्हणजे नट्टापट्टा आलाच. तुम्ही कन्यापूजानाच्या वेळेस मुलींना साजशृंगारातील कोणत्याही वस्तू नक्की देऊ शकता. यामध्ये क्लिप्स, हेअर बॅन्ड्स देऊ शकता.

नक्की वाचा: Navratri Kanya Pujan 2021: कन्या पूजन कसे कराल, जाणून घ्या योग्य पद्धतीसह विधी.

दरम्यान नवरात्री मध्ये अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्या पूजन करण्याची पद्धत आहे. यंदा नवरात्रीत अष्टमी तिथी 13 ऑक्टोबरला आहे तर नवमी 14 ऑक्टोबरला आहे. या दिवशी घरी मुलींना बोलावून आदिशक्तीच्या रूपात त्यांचं पूजन करू शकता.