हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्वाचा मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये देवी मातेच्या दुर्गाच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजाकेली जाते. हिंदू धर्मात हे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. यंदाचा नवरात्री उत्सव गुरुवार, 07 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. चैत्र आणि शारदीय नवरात्री वर्षात येणाऱ्या नवरात्रांपैकी सर्वात महत्वाची मानली जातात.नवरात्रीच्या शुभ सणाला, आपण आपल्या घराच्या मुख्य गेट समोर किंवा मंदिराच्याबाजूला सुंदर रांगोळी डिझाईन्स काढून देवीचे स्वागत करू शकता. सणासुदीला रांगोळी काढणे घरात सकारात्मकता आणते आणि देवी दुर्गाला प्रसन्न करते. जर तुम्हाला ही नवरात्री च्या शुभ प्रसंगी सुंदर रांगोळी डिझाईन्स काढायच्या असतील तर आज आम्ही काही सोप्या रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत.(Navratri Colors 2021 Day 1: नवरात्रीचा दिवस पहिला! पहा कोणत्या रंगाचे कपडे परिधान कराल)
नवरात्री रांगोळी डिझाईन्स
9 दिवस 9 रंगाच्या रांगोळी डिझाईन्स
नवरात्री स्पेशल नथ रांगोळी
नवरात्रीच्या 9 रंगांची रांगोळी
कोल्हापूर महालक्ष्मी रांगोळी
तेव्हा यंदा नवरात्रीच्या 9 दिवशी या सुंदर आणि आकर्षक रांगोळी दारापुढे किंवा मंदिराच्या बाहेर नक्की काढा