शारदीय नवरात्रोत्सव (Shardiya Navratri Utsav) हे हिंदू बांधवांसाठी नऊ रात्रींच्या जागरणाचं एक खास आणि मंगलमय पर्व असतं. भारतामध्ये नवरात्र यंदा 26 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर नवरात्र आणि 5 ऑक्टोबर दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे. आदिशक्तीची पूजा करण्याचा हा नवरात्रीचा उत्सव मोठ्या धामधूमीमध्ये साजरा केला जातो. यामध्ये ललिता पंचमी, महाअष्टमी, कन्या पूजन, माता की चौकी, भोंडला असे विविध कार्यक्रम असतात. दक्षिण भारत आणि उत्तर भारत सोबतच पश्चिम बंगालमध्ये या नवरात्रीमध्ये दुर्गापूजा साजरी केली जाते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण असतं. मग या नवरात्र आरंभाच्या शुभेच्छा तुमच्या मित्र मैत्रिणींना, प्रियजनांना, नातेवाईकांना देत शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात आनंदमय वातावरणामध्ये करा.
शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना करून या सणाची सुरूवात होते. यामध्ये नऊ धान्य पेरून घट, सुगड पूजले जाते. त्यानंतर प्रत्येक दिवशी एक माळ चढवली जाते. दहाव्या दिवशी त्याचं उत्थापन केले जाते. जागरणाची रात्र गरबा खेळून रंगवली जाते. महाराष्ट्रात भोंडला देखील खेळला जातो. हे देखील नक्की वाचा: Navratri 2022 Invitation Card Format in Marathi: शारदीय नवरात्रीत भोंडला ते 'माता की चौकी'चं सख्यांना आमंत्रण देण्यासाठी WhatsApp Messages, Images .
शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा
नवरात्रीच्या मंगल समयी
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!
चमचमती चांदण्या
उजळला चांदवा
टिपरीवर वाजे टिपरी
तुझ्या साथीने रास नवा
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपिन संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
नारी तू नारायणी
नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजडे
सृष्टी नमितो आम्ही तुजला
नवरात्रीच्या शुभेच्छा!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा
नवरात्रीचे पहिले तीन दिवस देवी दुर्गाच्या पूजेला समर्पित आहेत. ही पूजा देवीची उर्जा आणि शक्तीसाठी केली जाते. नवरात्रीचा चौथा, पाचवा आणि सहावा दिवस लक्ष्मीच्या पूजेला समर्पित आहे, जी समृद्धी आणि शांतीची देवता आहे. सातव्या दिवशी कला आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. आठव्या दिवशी देवीचा सन्मान आणि निरोपार्थ 'यज्ञ' केला जातो. नववा दिवस म्हणजे नवरात्रीचा शेवटचा दिवस. याला महानवमी असेही म्हणतात. या दिवशी कन्यापूजन केले जाते. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी साजरी होते. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. हा दिवस नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस मानला जातो.