महाराष्ट्रात यंदा कोरोनाच्या सावटाला दूर सारत गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला. गणेशोत्सवापाठोपाठ आता तरूणाईला वेध लागले आहेत ते म्हणजे नवरात्रोत्सवाचे (Navratri). 26 सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरूवात होत आहे. हिंदू धर्मीय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. गुजरातमध्ये जसा गरबा खेळला जातो तसा महाराष्ट्रात भोंडला देखील खेळण्याची पद्धत आहे. आदिशक्तीची रूपं पूजताना समाजातील महिलांना, तरूणींना, मुलींचा सन्मान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे या नवरात्रीत तुमच्या घरी देखील हळदी कुंकू, कन्यापूजन, भोंडला, माता की चौकी अशा काही कार्यक्रमांचं आयोजन असेल तर तुमच्या सख्यांना आमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिकेचे हे काही नमुने तुम्हांला नक्कीच मदतीचे ठरू शकतील.नक्की वाचा: Shardiya Navratri 2022 Date: 26 सप्टेंबरला घटस्थापना; जाणून यंदा नवरात्रीमध्ये ललिता पंचमी, महाअष्टमी चा दिवस कधी?
नवरात्री हा सण यंदा 26 सप्टेंबर घटस्थापना ते 5 ऑक्टोबर दसरा असा दहा दिवस साजरा केला जाणार आहे. मग त्याचा आनंद या वर्षी केवळ व्हर्च्युअल नव्हे तर थेट गळाभेट घेत घेण्यासाठी सज्ज व्हा. नक्की वाचा: Navratri 2022 Colours List : 26 सप्टेंबरला घटस्थापनेपासून 4 ऑक्टोबर पर्यंत नऊ रात्रींचे नऊ रंग कोणते?
नवरात्र आमंत्रण 2022
नमुना 1:
नवरात्री मध्ये महाअष्टमी च्या दिवशी आमच्या घरी 'माता की चौकी' चं आयोजन करण्यात आलं आहे. तरी आपण यामध्ये सहभागी व्हावं ही अपेक्षा
स्थळ-
तारीख-
वेळ-
--------------------------
नमुना 2:
जय माता दी
नवरात्री दरम्यान 'माता रानी च्या जागरणा'चं सस्नेह आमंत्रण
स्थळ-
वेळ-
--------------------------
नमुना 3:
नवरात्री मध्ये यंदा ..... संकुलामध्ये भोंडला चं आयोजन करण्यात आलं आहे. तरी पारंपारिक मराठी वेशभूषेमध्ये तुम्ही तुमच्या सख्या-सवंगड्यांसोबत या खेळामध्ये सहभागी व्हावं हे आग्रहाचं निमंत्रण
वेळ -
स्थळ-
नमुना 4:
आमच्या येथे महाष्टमी दिवशी कन्यापूजन आणि माता की चौकी चं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये आपल्या लेकींसह उपस्थिती अपेक्षित आहे.
स्थळ-
------------------
नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केलि जाते. यानिमित्ताने देवीची मंदिरं सजतात. अनेक भाविक नवरात्रीत हमखास देवीची खणा-नारळाने ओटी भरतात आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतात. काही भाविक नवरात्रीचे नऊ दिवस कडक उपवास करून हा सण साजरा करतात.