Shardiya Navratri 2022 Date: 26 सप्टेंबरला घटस्थापना; जाणून घ्या यंदा नवरात्रीमध्ये ललिता पंचमी, महाअ‍ष्टमी चा दिवस कधी?
Navratri images (Photo Credits: File Image)

हिंदू धर्मीय शारदीय नवरात्र (Shardiya Navratri) मोठ्या प्रमाणात आणि सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरी करतात. आदिशक्तीचा जागर करण्यासाठी साजरी केली जाणारी ही नवरात्र यंदा 26 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. 26 सप्टेंबर पासून सुरू होणार्‍या नवरात्रीची सांगता 5 ऑक्टोबरला दसरा सण साजरा करून केली जाणार आहे. मग या नवरात्रीमध्ये यंदा घटस्थापनेचा दिवस (Ghatasthapana), ललिता पंचमी (Lalita Panchami), अष्टमी (Ashtami) कधी आहे हे देखील जाणून घ्या आणि चैतन्यमय अशा नवरात्रीसाठी सज्ज व्हा. कोरोना संकट दूर सारून यंदा गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र देखील दणक्यात साजरी करण्यासाठी तरूणाई सज्ज झाली आहे.

नवरात्र 2022 मधील महत्त्वाचे दिवस

नवरात्रीची सुरूवात घटस्थापनेने होते. 26 सप्टेंबर दिवशी घटस्थापना केली जाणार आहे. हा नवरात्रीमधील पहिला दिवस आहे. त्यानंतर ललिता पंचमी 30 सप्टेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. महाअष्टमी 3 ऑक्टोबर दिवशी आहे. तर दसरा 5 ऑक्टोबर दिवशी साजरी केला जाणार आहे.

नवरात्रोत्सव 2022 तारखा आणि तिथी

  1. नवरात्रीचा पहिला दिवस - 26 सप्टेंबर - प्रतिपदा
  2. नवरात्रीचा दुसरा दिवस - 27 सप्टेंबर - द्वितिया
  3. नवरात्रीचा तिसरा दिवस - 28 सप्टेंबर - तृतीया
  4. नवरात्रीचा चौथा दिवस - 29 सप्टेंबर - चतुर्थी
  5. नवरात्रीचा पाचवा दिवस -30 सप्टेंबर - पंचमी
  6. नवरात्रीचा सहावा दिवस - 1 ऑक्टोबर - षष्ठी
  7. नवरात्रीचा सातवा दिवस - 2 ऑक्टोबर - सप्तमी
  8. नवरात्रीचा आठवा दिवस - 3 ऑक्टोबर - अष्टमी
  9. नवरात्रीचा नववा दिवस - 4 ऑक्टोबर - नवमी
  10. नवरात्रीचा दहावा दिवस - 5 ऑक्टोबर - दशमी

पुराण कथा आणि मान्यतांनुसार कलश किंवा घट स्थापना ही सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य आणि मंगल कामना यांचं प्रतिक मानलं जातं. कलशामध्ये सारे ग्रह, नक्षत्र यांचा वास असतो. याशिवाय कलशामध्ये भगवान ब्रम्ह, विष्णू आणि महेश यांच्या समवेत नद्या,धार्मिक स्थळं आणि 33 कोटी देव विराजमान असतात. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना खास असते. Shardiya Navratri 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभीनाक्याच्या नवरात्रोत्सवाच्या मंडप पूजनाचा सोहळा संपन्न.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवींना आवाहन करून 9 दिवस तिची पूजा केली जाते. काही भक्त हे 9 दिवस अनवाणी चालतात. व्रत ठेवतात. केवळ फलाहार करतात आणि दसर्‍याच्या दिवशी व्रत सोडतात.

टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आलेला आहे. लेटेस्टली याची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.