शारदेय नवरात्रीचा (Navratri 2022)  आज शेवटचा म्हणजे महानवमीचा (Maha Navami) दिवस आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या (Durga Mata) नऊ वेगवेगळ्या रुपांना समर्पित केल्या गेला. आज नवरात्राची नववी माळ असून नवदुर्गेचे नववं रुप स्वरुप म्हणजे सिध्दीदात्री देवीला (Siddhidatri Devi) समर्पित आहे. तसेच आजचा रंग गुलाबी (Pink) रंग आहे. नवरात्रीच्या (Navratri) नऊ दिवसात देवीच्या नावाने नऊ दिवस व्रत (Fast) केले जाते तसेच नऊ रुपांची भक्ती भावाने पूजा केली तर आज या उत्सावीची सांगता करण्याचा दिवस आहे. नवरात्र हा उत्सव फक्त महाराष्ट्रातचं (Maharashtra) नाही तर संपूर्ण देशभरात गेल्या नऊ दिवसात धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या राज्यातील पध्दती वेगळ्या असल्या तरी विविधतेने हा उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो.

 

आज शारदीय नवरात्रीचा नववा दिवस आहे. पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आजच्या दिवशी दुर्गा मातेने महिशासुर राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे.  या दिवशी माँ दुर्गेच्या नवव्या रूपाची म्हणजेच सिध्दीदात्री देवीची (Siddhadatri Devi) पूजा आणि उपसना केला जाते. देवी सिद्धिदात्री कमळावर (Lotus) बसून सिंहावर स्वार होते. तिला चार हात आहेत - तिच्या उजव्या हातात गदा आणि सुदर्शन चक्र आहे आणि तिच्या डाव्या हातात कमळ आणि शंख आहे. तिच्याभोवती गंधर्व, यक्ष, सिद्ध आणि असुर आहेत, जे तिची पूजा करतात.हिंदू पौराणिक कथा सांगितल्या प्रमाणे जेव्हा ब्रह्मांडा निर्माण झालं तेव्हा भगवान रुद्राने आदि-पराशक्तीची उपासना केली. तेव्हा देवी आदिशक्ती खुद्द भगवान शंकराच्या डाव्या अर्ध्या भागातून देवी सिद्धिदात्रीच्या रूपात प्रकट झाली. जेव्हा हे घडले तेव्हा भगवान शिव अर्ध-नारीश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. (हे ही वाचा:- Dussehra 2022 Rangoli Designs: दसरा दिवशी 'या' आकर्षक रांगोळ्यांनी साजरा करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस)

 

देवी सिद्धिदात्री (Devi Siddhidatri) हे  दुर्गेचे नववे रूप आहे आणि तिच्या नावाचा अर्थ आपल्याला शक्ती देणारी आहे. महानवमीला (Maha Navami) भक्त देवी सिध्दीदात्रीची पूजा करतात आणि असे मानले जाते की ती तिच्या भक्तांचे अज्ञान दूर करते आणि त्यांना ज्ञान देते. ती त्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करते आणि अगदी भगवान शिवाला देवी सिद्धिदात्रीच्या कृपेने सर्व सिद्धी मिळाल्याने भगवान शंकराला (Lord Shiva) देखील आशिर्वाद देणारी देवी सिध्दीदात्रीचं आहे असं पौराणिक कथेत नमूद आहे.