Bhondla Songs: आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला (Navratri 2019) सुरुवात झाली आहे. भारत देश हा वैविध्यतेसाठी ओळखला जात असल्याने आपल्याकडे सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. यानुसार नवरात्रीमध्ये देखील गुजरात मध्ये गरबा दांडिया (Garba Dandiya) खेळून आनंद साजरा करण्याची पद्धत आहे. तर कर्नाटकात यक्षगान , आंध्र-प्रदेशात रामलीला असा नवरात्री विशेष सोहळा आयोजित केला जातो. महाराष्ट्रात सुद्धा भोंडला (Bhondla), हादगा (Hadga), भुलाबाई (Bhulabai) अशा स्वरूपातीळ खेळ खेळण्याची परंपरा आहे. आश्विन पक्षात हस्त नक्षत्रापासून भोंडला सुरु होतो.एका ठिकाणी पाटीवर मध्यभागी हत्तीची प्रतिमा काढून त्याभोवती लहान मुलींपासून विवाहितांपर्यंत सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणत फेर धरतात, आणि यालाच भोंडला (Bhondla) असे म्हंटले जाते.
ऐलमा पैलमा गणेश देवा पासून गणेशाला वंदन करून मग एक एक करत चिडवणारी, टेर ओढणारी किंवा खिरापतीची मागणी करणारी गाणी गायली जातात. यंदा तुम्हालाही जर का भोंडला खेळून आपल्या परंपरेनुसार सण साजरा करायचा असेल तर ही काही धम्माल पारंपरिक गाणी नक्की पहा..
ऐलमा पैलमा गणेश देवा
श्रीकांता कमलाकांता
एक लिंबू झेलू बाई
एकच कारलं पेर ग सुने
Navratri 2019: आश्विन महिन्यात खेळला जाणारा भोंडला का आहे खास, जाणून घ्या या परंपरेची वैशिष्ट्य
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी
काळी चंद्रकळा
आड बाई आडोनी
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने भोंडला खेळला जातो, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात या खेळाला हादगा म्ह्णूनही संबोधले जाते. विदर्भात या भोंडल्याला भुलाबाई असेही म्हंटले जाते.पूर्वीच्या काळी स्त्रियांना आपल्या रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा म्ह्णून अशा प्रकारचे सण उत्सव साजरे केले जात होते. तर अलीकडे या परंपरेचा वारसा जपण्यासाठी अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.