National Girl Child Day 2024 Wishes: राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त खास Messages, WhatsApp Status, Greetings शेअर करत द्या शुभेच्छा
National Girl Child Day 2024 Wishes (File Image)

National Girl Child Day 2024 Wishes: भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ (National Girl Child Day 2024) साजरा केला जातो. 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास यांनी या दिवसाची सुरुवात केली होती. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये मुली वाचावा, मुलीसाठी आरोग्य आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे समाविष्ट आहे. 24 जानेवारी रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना नारी शक्ती म्हणून स्मरण केले जाते. या दिवशी 1966 साली इंदिरा गांधींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला होता, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या कन्येने एका सर्वोच्च पदावर पोहोचलेली कामगिरी दरवर्षी स्मरणात राहावी आणि महिला सक्षमीकरणाबाबत जागरूक व्हावे या उद्देशाने 24 जानेवारी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

देशातील मुलींना भेडसावणाऱ्या सर्व असमानतेबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे, मुलींच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण याविषयी जागरूकता निर्माण करणे, मुली आणि महिलांवरील या गुन्ह्यांपासून त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्यासमोरील आव्हानांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे या उद्देशाने राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. (हेही वाचा: Maghi Ganpati 2024 Invitation Card Format in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त घरी गणरायाच्या दर्शनाला आमंत्रित करण्यासाठी Messages, Images!)

तर राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधत खास WhatsApp Status, Greetings, Wishes शेअर करत द्या शुभेच्छा.

National Girl Child Day 2024 Wishes
National Girl Child Day 2024 Wishes
National Girl Child Day 2024 Wishes
National Girl Child Day 2024 Wishes
National Girl Child Day 2024 Wishes
National Girl Child Day 2024 Wishes
National Girl Child Day 2024 Wishes

दरम्यान, राष्ट्रीय बालिका दिन हा एक विशेष दिवस आहे, जो मुलींच्या हक्कांसाठी आणि संधींसाठी लढण्याची संधी देतो. हा दिवस साजरा करून, आपण देशातील मुलींच्या चांगल्या भविष्याचा पाया रचू शकतो, ज्यामध्ये सर्व मुलींना समान हक्क आणि संधी दिल्या जातील. आज देशाच्या कन्या प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकावत आहेत.

मात्र स्त्री-पुरुष असमानता हे भारतीय समाजात आजच नाही तर फार पूर्वीपासून एक मोठे आव्हान आहे. महिलांवरील भेदभावाची ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि सामाजिक स्तरावर मुलींची स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने भारत सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत, त्यात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान, 'सुकन्या समृद्धी योजना', मोफत किंवा अनुदानित शिक्षण आणि महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जागांचे आरक्षण यांचा समावेश आहे.