![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/01/MAghi-380x214.jpg)
गणेशभक्तांसाठी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी प्रमाणेच माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) ची देखील तितकीच उत्सुकता असते. महाराष्ट्रात माघी गणेश जयंतीला देखील घरात गणेशमूर्ती आणून तिची पूजा करण्याची पद्धत आहे. मग यंदा तुमच्याही घरी बाप्पा विराजमान होणार असेल तर तुमच्या नातेवाईकांना, प्रियजणांना, आप्तेष्टांना गणेश जयंती निमित्त घरी आलेल्या बाप्पाच्या दर्शनाला आमंत्रित करण्यासाठी या निमंत्रण पत्रिकांचा मेसेज फॉर्मेट शेअर करू शकाल.
हिंदू पुरण कथांनुसार, गणपती बाप्पाचा जन्म हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला आहे. या चतुर्थीच्या निमित्ताने काही गणेशभक्त घरात गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापित करून त्याची पूजा अर्चना करतात. यावर्षी 13 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती असल्याने त्यानिमित्ताने घरात बाप्पाची पूजा केली जाते. (हे ही वाचा:- Maghi Ganesh Jayanti Special Modak Recipes: माघी गणेश जयंती विशेष नैवेद्याला तीळाचे मोदक कसे बानवाल?)
गणेश जयंती निमित्त आमंत्रण पत्रिका
श्री गणेशाय नम:
सालाबादा प्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे. या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर हजेरी लावावी.
आपले लाडके,
पत्ता:
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/01/1-Maghi-Gannesh-Jayanti-Invitation.jpg)
-----------------------------------------------------------------------------------------------
माघी गणेश उत्सवामध्ये यंदाही आमच्या घरी दरवर्षी प्रमाणे गणरायाचं आगमन होणार आहे. तरी बाप्पाच्या दर्शनासाठी 13 फेब्रुवारीला घरी येऊन तीर्थ प्रसादाचा आस्वाद घ्यावा.
पत्ता-
--------------------------------------------------------------------------------------
ॐ श्री गणेशाय नम:॥
आमच्या घरी यंदा 13 फेब्रुवारी दिवशी गणरायाचं आगमन होणार आहे. या निमित्त होणार्या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री आणि सौ ... कङून आग्रहाचे निमंत्रण!
पत्ता—
तारीख,वेळ
13 फेब्रुवारी दिवशी सकाळी 9 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा
श्री गणेश हा सुखकर्ता, विघ्नहर्ता म्हणून ओळखला जात असल्याने कोणत्याही शुभ प्रसंगी पहिल्यांदा गणरायाची पूजा करण्याची हिंदू धर्मियांची रीत आहे. त्यामुळे माघी गणेशोत्सवामध्येही गणेश जयंती साजरी करताना त्यांच्यामध्ये मोठा उत्साह असतो. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणे हा माघी गणेशोत्सव देखील साजरा होतो.