नाताळचा (Natal) सण हा ख्रिसमस म्हणून देखील साजरा केला जातो. प्रामुख्याने पाश्चात्य देशात ख्रिसमस (Christmas) या सणाला घेऊन मोठी धामधूम असते. पण भारतातही मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधव यानिमित्ताने प्रार्थना करतात. घरात गोडा-धोडाचे पदार्थ बनवतात आणि नव्या वर्षाचं तितक्याच उत्साहाने स्वागत करण्यासाठी सज्ज देखील होतात. ख्रिसमस म्हटला की सांताक्लॉज, गिफ्ट्स, सरप्राईज देखील आलेच. नव्या वर्षाच्या आगमनापूर्वीचे 5-6 दिवस चैतन्यमय करणारा हा नातळचा सण तुमच्या कुटुंबियांच्या, प्रियजणांच्या, मित्र-मंडळींच्या आयुष्यातही आनंद घेऊ यावा यासाठी सोशल मीडीयातूनही तुम्ही त्यांना मराठमोळ्या शुभेच्छा, ग्रीटिंग्स, Wishes, Messages, WhatsApp Status, GIFs शेअर करत शुभेच्छा देऊ शकता.
नाताळ निमित्त लहान मुलांना अनेकजण गिफ्ट्स देतात. 24 डिसेंबरच्या रात्री बेड जवळ सॉक्स ठेवण्याची पद्धत आहे. अशी मान्यता आहे की सांताक्लॉज या सॉक्स मध्ये गिफ्ट्स ठेवून जातो. आता हे किती खरं किती खोटं हा वादादित मुद्दा असला तरीही तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तींसाठी नाताळच्या सणाची सुरूवात तुम्ही खास मेसेज पाठवून आनंदात करू शकता. हे देखील वाचा: Christmas Gift Wrapping Ideas: ख्रिसमस गिफ्ट्स आकर्षक पद्धतीने रॅप करण्यासाठी काही हटक्या आयडियाज (Watch Video).
ख्रिसमसच्या शुभेच्छा
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो.
तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो.
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा
नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात
मागूया साऱ्या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गाऊ सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आला सांताक्लॉज घेऊन शुभेच्छा हजार
चिमुकल्यांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुमच्यासाठीही खास होवो हा आनंदाचा सण वारंवार
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
सारा आनंद, सगळं सौख्य
होवो तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता,
यशाची सारी शिखरं, ऐश्वर्य
हे तुम्हांला मिळो याच
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
ना ग्रिटिंगकार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे.
सच्च्या दिलाने फक्त तुला ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.
मेरी ख्रिस्मस
यंदा 25 डिसेंबर हा दिवस शनिवारी आहे. त्यामुळे विकेंडला या आनंदाच्या सणाची मज्जा अजूनच द्विगुणित करू शकता. ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक जण पार्ट्यांचं आयोजन करतात. खास मेजवानी आयोजित करून मित्र मंडळी आणि नातेवाईकांसोबत हा दिवस साजरा करतात. यंदा ओमिक्रॉनची दहशत पाहता मोठ्या पार्ट्यांचं आयोजन करण्यावर बंधन आली आहेत. त्यामुळे यंदा देखील व्हर्च्युअलीचं ख्रिसमसचं सेलिब्रेशन करण्यात सार्यांची सुरक्षा आहे.