Mahatma Jyotiba Phule Punyatithi 2020: महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पाहा त्यांच्या जीवनावर आधारीत नाटक, ऑडिओ बुक आणि मालिका 
Photo Credit : Wikimedia Commons

Mahatma Jyotiba Phule Death Anniversary 2020: अत्यंत हुशार, बुद्धिमान, धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule ). त्यांचे वर्णन शब्दांत व्यक्त करता येणार नाही असेच नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. स्वत: साक्षर होऊन आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना देखील त्यांनी साक्षर केले आणि समाजाचा रोष पत्करत अनेक स्त्रियांना साक्षर केले. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते. महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. (Mahatma Jyotiba Phule Death Anniversary : महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथि निमित्त जाणून घेऊयात त्यांचे 10 प्रेरणादायी विचार )

महात्मा फुले पुण्यतिथि निमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यावर आधारित असलेले सिनेमा, नाटक,मालिका.

मराठी नाटक : सत्यशोधक 

हिंदी ऑडिओ बुक - गुलामगिरी 

मराठी मालिका - आवाज 

कलर्स मराठी या वाहिनीवर दाखवण्यात येते ही मालिका तुम्ही Voot App वर पाहू शकता

हिंदी शॉर्ट फिल्म - भारत एक खोज 

दूरदर्शन द्वारा भारत एक खोज नावाची एक फिल्म दूरदर्शन वर दाखवण्यात आली होती.जी YouTube वर तुम्ही पाहु शकता.

महात्मा फुले यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे.‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.