ज्योतिबा फुले (Jyotiba Phule) यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला आणि 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचा मृत्यू झाला.त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंद राव हे एक शेतकरी होते आणि ते पुण्यात फुले विकायचे.ज्योतिबा फुले तरुण असतानाच त्याची आई मरण पावली. परोपकारी, लेखक, तत्वज्ञ आणि क्रांतिकारक म्हणून ज्योतिबा फुले ओळखले जातात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीभेद, लिंगभेद, जात यविरुद्ध मोठी लढाई लढविली. एवढेच नव्हे तर न्याय आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित समाजाची दृष्टी त्यांनी मांडली. ते महिलांच्या शिक्षणाची खूप बाजू घेत असे. हेच कारण आहे की जेव्हा त्यांनी 1840 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्याशी लग्न केले तेव्हा त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांना अभ्यासासाठी प्रेरित केले. 1852 मध्ये त्यांनी तीन शाळा स्थापन केल्या, परंतु 1858 मध्ये निधी अभावी त्या बंद पडल्या.नंतर सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका झाल्या. त्यांनी लोकांना आपल्या मुलांना शिक्षित करण्याचे आवाहन केले. (Shubh Vivah Muhurat 2020-21: देवउठनी एकादशी झाल्यानंतर डिसेंबर ते पुढच्या वर्षातले लग्नासाठीचे शुभ मुहूर्त जाणून घ्या)
आज तत्वज्ञ आणि क्रांतिकारक ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे प्रेरणादायी विचार
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते.
नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे.
भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसच आहे.
समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.
ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात.
जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.
विद्वेविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.
जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.
मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे.