
भारत देशामध्ये सण साजरा करताना निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची देखील भावना असते. आपल्या सण समारंभांमध्ये संस्कृती देखील जपली जाते. कृषीप्रधान आपल्या देशामध्ये आषाढ महिन्यात शेतकरी बांधव त्यांच्यासोबत शेतात राबणार्या बैलांच्या मेहनतीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर/ बैलपोळा हे सण साजरे करतात. यंदा महाराष्ट्रीय बेंदूर (Maharashtra Bendur) हा 19 जुलैला साजरा केला जाणार आहे. या निमित्त शेतकर्यांचा सखा बैलाची खास पूजा केली जाते. मग बेंदूरच्या निमित्ताने तुम्ही देखील शेतकर्यांना मराठमोळ्या शुभेच्छा WhatsApp Status, Greetings, Images, Facebook Messages, Photos द्वारा शेअर करू शकता.
ज्यांच्या घरी बैल आहेत अशा घरात बैलांची पूजा तर होतेच मात्र ज्यांच्या घरी बैल नाहीत, असे लोक मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी प्रत्येक घरात गोडा-धोडाचे जेवण बनवले जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. मग अशा या सणाचा आनंद शेअर करण्यासाठी ही खास ग्रीटिंग्स तुम्ही नक्की शेअर केली आहे. Maharashtra Bendur2024: बेंदूर सणाची तारीख, पूजा विधी आणि महत्व, जाणून घ्या .
महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या शुभेच्छा





बेंदूर सणाच्या दिवशी शेतीच्या सर्व कामांना सुट्टी देत शेतकरी सण साजरा करतो. या दिवशी बैलांना हिरवा चारा दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवलं जातं. त्याच्या शिंगाना रंग लावला जातो. त्यावर बेगड्या चिटकवतात. त्यात कणकीचे कंगण घातले जातात. त्यानंतर शिंगांना शेंब्या घातल्या जातात. पाठीवर झूल, डोक्याला बाशिंग आणि गळ्यात चाळ घालतात. त्यानंतर त्याची पूजा करुन त्याला गावदेवासाठी नेले जाते. हा सर्व लवाजमा गावच्या वेशीत पोहोचतो तेव्हा गावकरी बैलांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करतात.