Lokmanya Tilak (Photo Credits: FliCkr)

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak) यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात रत्नागिरीच्या चिखली गावामध्ये जन्मलेल्या लोकमान्य टिळकांनी अनेकदा आपल्या भाषणातून, लेखणीमधून तर प्रसंगी आंदोलनामधून ब्रिटीश सरकार विरूद्ध आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राणांची आहुती देऊन भारत देशाला ब्रिटीशांच्या जाचातून आपली मुक्तता करणार्‍या भारतमातेच्या सुपुत्रांपैकी एक असलेल्या बाळ गंगाधर टिळक यांना आज 164 व्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली व्यक्त करताना त्यांच्या आयुष्यातील आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी. Lokmanya Tilak Jayanti 2020 Quotes: लोकमान्य टिळक यांचे विचार प्रेरणादायी विचार.

लोकमान्य टिळक यांच्याबद्दल खास गोष्टी

  • बाळ गंगाधर टिळक यांना 'लोकमान्य' या उपाधीने देखील ओळखले जाते.
  • महाराष्ट्रात 'असंतोषाचे जनक' म्हणून लोकमान्य टिळक यांचीओळख आहे. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश सत्ता उलथून लावण्याच्या लढ्यात जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले होते. त्यापैकी टिळक हे 'जहालमतवादी' होते.
  • पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांनी 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून गणित विषयात पदवी प्राप्त केली व त्यापाठोपाठ लगेचच 1879 मध्ये त्यांनी एलएलबी सुद्धा केली.
  • संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांचेदेखील ते अभ्यासक होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही देखील उल्लेखनीय आहेत. यासोबतच त्यांनी गीतारहस्य देखील लिहले आहे.
  • लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांना जुळणारी असल्याने या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे म्हटले जायचे.
  • केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र  लोकमान्य टिळकांनी सुरू केली. दरम्यान 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' या अग्रलेखातून त्यांनी पुणे प्लेग साथीदरम्यान ब्रिटिशांनी अंमलात आणलेल्या प्लेग रोखण्यासाठी घरात घुसून फवरणी करण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी जळजळीत अग्रलेख लिहीत ब्रिटीश सत्ताधिकार्‍यांना प्रश्न विचारला होता.

Lokmanya Tilak Jayanti 2020: लोकमान्य टिळक जयंती निमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी - Watch Video 

पुण्यातील प्लेगच्या आजारामध्ये लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 दिवशी निधन झाले. टिळकांनी भारतीय जनतेला एकत्र आणलं, आपल्या प्रखर विचारांनी नेहमीच सर्वांसमोर आदर्श घालून दिला, त्यामुळेच भारताच्या इतिहासात टिळक हे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे.