दिवाळी किंवा दीपावली हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे. देवी लक्ष्मी, गणपती , देवी सरस्वती, महाकाली यांची प्रामुख्याने पूजा या दिवशी केली जाते. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. प्रदोष काळात दिवाळीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की जो व्यक्ती दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची खऱ्या मनाने पूजा करतो त्याची सर्व दुःख दूर होतात. यंदा 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. जाणून घेऊयात या दिवशी पुजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधि. (Laxmi Pujan 2021 Easy Rangoli Designs: लक्ष्मी पूजनासाठी रांगोळीच्या माध्यमातून मातेचं स्वागत करण्यासाठी सोप्या डिझाईन्स (Watch Video)
लक्ष्मीपूजनासाठी शुभ वेळ (Lakshmi Puja 2021 Muhurat )
सायंकाळी ६ वाजून ०९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत
कालावधी: १ तास ५५ मिनिटे
प्रदोष काळ: १७:३४:०९ ते २०:१०:२७
वृषभ कालावधी: १८:१०:२९ ते २०:०६:२०
पूजेसाठी लागणारे साहित्य
लक्ष्मीपूजनासाठी दिवा, हळद-कुंकू, अगरबत्ती, कापसाची वस्त्रे, तांदूळ, नारळ, सुटे पैसे, दागिने, केरसुणी, रांगोळी,कवड्या,तांब्याचा शिक्का,मंगल कलश,श्रीयंत्र, कमळ वा झेंडूचे फुलं आणि देवीसाठी गोडाचा नैवेद्य असणे गरजेचे आहे.
लक्ष्मीपूजनाचा विधी
लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. तसेच तांब्यात श्रीफळ ठेवून त्याच्या बाजून पाच आंब्याची पाने ठेवतात. लक्ष्मीची मूर्ती पाटावर ठेवून पाटाच्या बाजूने केळीची पाने लावली जातात. तसेच घरातील सर्व सोन्याचे दागिने, पैसे, आदी सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे, अमावस्येला ‘लक्ष्मी’ आणि ‘कुबेर’ या देवतांचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर, कुबेर हा संपत्ती संग्रहक असल्याचे म्हटले जाते. या दिवशी नवीन केरसुणीची पूजा केली जाते.