माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची आज 2 ऑक्टोबर (2 October) जयंती. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मुगलसराय येथे झाला. ते 1920 मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. स्वाधीनता संग्रामध्ये त्यांची भूमीका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली. त्याचसोबत 1921 चे असहकार आंदोलन, 1930 ची दांडी यांत्रा आणि 1942 मध्ये सुरु करण्यात आलेले भारत छोडो आंदोलन यात त्यांची विशेष भूमका राहिली आहे. लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान पंडीत जवारहलाल नेहरु यांच्या निधनानंतर पंतप्रधान झाले. पंतप्रधान असताना त्यांनी 'जय जवान, जय किसान' हा नारा दिला. लाल बहादुर शास्त्री यांच्याबाबत आपल्याला या '10' गोष्टी माहिती आहेत काय?
लाल बहादुर शास्त्री यांच्या 08 गोष्टी
- लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 या दिवशी झाला. उत्तर प्रदेश राज्यातील मुगलसराय हे त्यांचे जन्मगाव. ते लहान होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
- लाल बहादुर शास्त्री यांना वडिलांच्या निधनानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांच्या काकाकडे पाठविण्यात आले. शिक्षणासाठी लालबहादूर शास्त्री प्रतिदिन अनेक मैल चालत जात.
- वय वर्षे अवघे 16 असताना राष्ट्रकार्यासाठी काही करण्याचे लाल बहादूर शास्त्री यांच्या मनाने घेतले आणि त्यांनी शिक्षण मध्येच सोडले. ते थेट महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनात सहभागी झाले.
- लालबहादु शास्त्री काशी विद्यापीठात गेले. विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव 'शास्त्री' असे होते. विशेष म्हणजे पुढे त्यांनाच शास्त्री या नावाने म्हणजे पदीवीनेच ओळखले जाऊ लागले.
- महात्मा गांधी यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यावर शास्त्री यांना तब्बल 7 वर्षे तुरुंगात काढावी लागली. (हेही वाचा, Lal Bahadur Shastri 115 Birth Anniversary: थोर स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल काही Interesting Facts)
- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक विभागांचा पदभार सांभाळला. रेल्वे, परिवहन, उड्डाण, आर्थ, उद्योग, गृह, यांसारखी अनेक खाती त्यांनी सांभाळली. पंडीत नेहरु आजारी असताना ते बिनखात्याचे मंत्री राहिले.
- लालबहादूर शास्त्री 1964 मध्ये पंतप्रधान झाले. त्यांच्याच कार्यकाळात 1965 मध्ये पाकीस्तानसोबत युद्ध झाले. त्या वर्षी देशात भयंकर दुष्काळही पडला होता. या वेळी संकट टाळण्यासाठी त्यांनी देशवासियांना एक दिवसाचा उपवार करण्याचे अवाहन केले होते. सोबतच अन्नधान्य स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी 'जय जवान जय किसान' हा नारा दिला.
- लालबहादूर शास्त्री हे महात्मा गांधी यांना गुरु मानत. महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्याबाबत एकदा म्हणाले होते मेहनत प्रार्थना करण्याप्रमाणेच आहे. लाल बहादुर शास्त्री हे भारतीय संस्कृतीची ओळख आहे.
दरम्यान, योगायोग असा की लालबहादूर शास्त्री आणि राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचा जन्म एकाच दिवशी झाला. त्यामुळे दोघांचीही जयंती एकाच दिवशी साजरी केली जाते. दोघांनीही आपले संपूर्ण जीवन देशाला समर्पीत केले.