
हिंदू संस्कृतीनुसार शरद पौर्णिमेला म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला (Kojagiri Purnima) धार्मिकरित्या महत्वाचे स्थान आहे, त्यामुळे साहजिकच ही पौर्णिमा दरवर्षी उत्साहात साजरे केली जाते. यंदा 13 ऑक्टोबर म्हणजेच आज रात्री कोजागरीचा पूर्ण चंद्र आकाशात पाहायला मिळणार आहे. या रात्रीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कोजागिरीला केले जाणारे दुधाचे नैवैद्य. असं म्हणतात की कोजागिरीच्या रात्री चंद्र 16 कलांमधून चमकत असतो तसेच चंद्राच्या शीतल छायेतून अमृत वर्षा होत असते. अशावेळी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे लाभदायी मानले जाते.अनेकदा या सर्व गोष्टींना धार्मिक समजुती मानून टाळले जात असले तरी यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत.
आता तुम्हीच बघा, दूध किंवा खीर बनवण्यासाठी आपण सर्वच तांदूळ, दूध, शेवया, सुका मेवा इत्यादी पदार्थ वापरतोच अन्य वेळेस हे पदार्थ आपण रोजच्या जेवणात समाविष्ट करत नाही त्यामुळे या निमित्ताने का होईना पण आपण त्याचे निदान सेवन करतो. हे पदार्थ अस्थमा आणि बद्धकोष्ठ सारख्या आजारावर भन्नाट गुणकारी आहेत.
पण मग त्याला नैवद्य का म्हणायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? कोजागिरीच्या रात्री नैवेद्याच्या रूपात खीर किंवा मसाला दूध काही वेळ चंद्राच्या छायेत ठेवले जाते आणि मग त्याचे सेवन करतात, या रात्री चंद्राचा प्रकाश सर्वाधिक असल्याने त्याचे गुणकारी तत्व अधिक प्रमाणात पृथ्वीवर पोहचतात, या वेळेत चंद्राची शीतल छाया ही दुधात देखील परावर्तित होते आणि त्याचा शरीराला फायदा होतो. काही ठिकाणी तर हे पदार्थ रात्रभर चंद्राच्या छायेत ठेवून सकाळी ग्रहण करण्याची रीत आहे. चला तर मग यंदाच्या कोजागिरी निमित्त हे पदार्थ बनवण्याच्या सोप्प्या झटपट रेसिपीज पाहुयात
कोजागरी पौर्णिमा मसाला दूध रेसिपी
Kojagiri Purnima 2019 Date: कोजागरी पौर्णिमा दिवशी लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ आणि महत्त्व काय?
कोजागिरी पौर्णिमा खीर रेसिपी
दरम्यान काही वेळासाठी आपण हे सर्व फायदे बाजूला ठेवले तरी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त स्पेशल मसाला दूध असो बासुंदी असो वा खीर, खवय्यांसाठी तर ही पर्वणीच असते.
(टीप- वरील लेख हा पूर्णतः प्राप्त माहितीवर आधारित आहे, लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)