Kojagiri Purnima 2019 Date: कोजागिरी पौर्णिमा दिवशी लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ आणि महत्त्व काय?
Kojagari Poornima (File Image)

Sharad Purnima 2019 Puja Date & Time:  अश्विन पौर्णिमा ही पावसाळा ऋतू नंतर येणारी पहिली पौर्णिमा त्यामुळे शरद ऋतूमधील या पौर्णिमेचे धार्मिक, शास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील विशेष महत्त्व असते. महाराष्ट्रात शरद पौर्णिमा (Sharad Purnima) ही कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) म्हणून साजरी केली जाते. यंदा रविवार, 13 ऑक्टोबर दिवशी कोजागिरी  पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरते आणि 'को जागती?' असा प्रश्न विचारते आणि त्याला वैभवप्राप्ती मिळते असे आख्यायिका आहे. मग यंदा तुम्ही देखील कोजागिरीच्या रात्री जागून हा सण साजरा करणार असाल तर जाणून घ्या नेमकी चंद्रोदयाची वेळ काय आहे? लक्ष्मी पूजनाची नेमकी वेळ काय आहे?  Happy Kojagiri Purnima Wishes: कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठमोळी ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरी करा शरद पौर्णिमा!

यंदा कोजागिरी  नेमकी कधी आहे? शुभ मुहूर्त काय?

कोजागिरी  हा सण अश्विन पौर्णिमेच्या रात्री साजरा केला जातो. त्यामुळे 13 ऑक्टोबरच्या रात्री हा लक्ष्मी आणि इंद्राची पूजा केली जाणार आहे.

पौर्णिमा तिथी प्रारंभ: 13 अक्‍टूबर 2019 च्या रात्री 12:36 मिनट

पौर्णिमा तिथी समाप्‍त: 14 अक्‍टूबर च्या रात्री 02 : 38 मिनट

चंद्रोदय वेळ : 13 अक्‍टूबर 2019 च्या संध्याकाळी 06 वाजून 16 मिनट

कोजागिरी पौर्णिमा मेसेज व्हिडिओ    

शरद पौर्णिमेदिवशी व्रत केल्याने सार्‍या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते अशी धारना आहे. विवाहित स्त्रिया संतानप्राप्तीसाठी तर माता आपल्या परिवाराच्या, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी कोजागरी पौर्णिमेचं व्रत करतात. या रात्रीचं आकाशातून अमृतवर्षा केली जाते असा देखील समज आहे.