Jyeshtha Gauri Pujan 2020: गौरी पूजनाला सौभाग्यवतींसाठी खास असणारं ओवसाचं सूप कसं तयार करतात? जाणून घ्या पुजाविधी
Gauri Avahan Wishes | File Image

Jyeshtha Gauri Pujan Ovasa: महाराष्ट्रामध्ये गणरायच्या पूजेसोबतच गौराईच्या आवाहनाची (Jyeshtha Gauri Aavahan)  आणि पूजनाची जंगी तयारी असते. यंदा 25 ऑगस्ट दिवशी गौरी आवाहन आणि 26 ऑगस्ट दिवशी गौरी पूजन (Jyeshtha Gauri Pujan) केले जाणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरात गौराईच्या आगमनानंतर गौरी पूजनाला 'ओवसं' (Ovasa)  देण्याची पद्धत असते. नवदांम्पत्यांसाठी हा ओवसं देण्याचा सण गणेशोत्सवाच्या काळातील खास रीती-भातींचा असतो. मग यंदा तुम्ही देखील ओवसं भरणार असाल जाणून घ्या ओवसाच्या सूपामध्ये कोणकोणते पदार्थ असतात? मानाची 5 ओवसं कोणाला दिली जातात?

कोकणामध्ये ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी सवाष्ण स्त्रिया गौरीचं ओवसं करतात. यामध्ये सुपाला हळदीकुंकू लावलेले दोरे गुंडाळले जातात. पाच प्रकारची पत्री (पानं) ठेवून त्यावर खारीक, खोबरं, गूळ, हळकुंड, नारळ, एखादं फळ, मिठाई, काळे मणी, हिरव्या बांगड्या यांनी सूप भरतात. नवविवाहित अशाप्रकारे 5 सुपं भरतात तर वर्षानुवर्ष ओवसं भरणार्‍या स्त्रिया एकच सूप भरून गौरी पूजन करतात. Gauri Ganpati Invitation Messages in Marathi: गणेशोत्सवात गौरी-गणपतीच्या दर्शनाला पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages आणि Images.  

 

नवविवाहित स्त्री पहिल्या वर्षी ओवस्यातील एक सूप माहेरी, एक सासरी, एक नवर्‍याला आणि अन्य दोन नात्यातील, शेजारपाजारी देऊन गौरी पूजनाचा सण साजरा करतात. दरम्यान यानंतर त्या नवविवाहितेला आशिर्वाद रूपी पैसे देण्याची देखील पद्धत आहे. Gauri Pujan 2020 Wishes: गौरी पूजन निमित्त मराठी Messages, Images, Whatsapp Status वर शेअर करुन द्या खास शुभेच्छा!

गौरी पूजनाचा दिवस हा माहेरवाशिणींसाठी खास आहे. त्यानिमित्त घरात झिम्मा, फुगड्या खेळल्या जातात. रात्र जागवली जाते. दुसर्‍या दिवशी गणपती सोबत गौराईचं देखील विसर्जन करण्याची पद्धत आहे.

गौरी पूजनाच्या नैवेद्याच्या पद्धती या प्रांतानुसार वेगवेगळ्या रीतींच्या आहे. काही ठिकाणी तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा बेत असतो तर काही घरात गोडाचा म्हणजे खीर पुरी किंवा पुरणपोळीचा बेत केला जातो.

दरम्यान आज संध्याकाळी विधिवत खड्यांच्या रूपाने प्रतिकात्मक गौरी घराघरामध्ये प्रवेश करणार आहे. मात्र तिची पूजा गौरी पूजनाच्या दिवशी केली जाते.