Ganpati Invitations| File Photo

Gauri Ganpati Invitation Card Messages:  यंदाचा गणेशोत्सव आता अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी बाप्पाची तयारी म्हटली की, घराची झाडलोट पासून मखर, आरास, गोडाचे पदार्थ, मोदकाची तयारी ते आमंत्रण, निमंत्रण असा घाट असतो. पण यंदा कोरोना संकटामुळे धामधूमीला थोडा ब्रेक लागला आहे. कोरोना व्हायरस जागतिक संकटामुळे यावर्षी बाप्पा   आणि गौराई (Gauri) यांचं घरामध्ये आगमन होईल पण हा सण साधेपणाने साजरा करण्यातच सार्‍यांचं हित आहे. म्हणून यावर्षी 22 ऑगस्टला गणपती बाप्पा (Ganpati Bappa) आणि 25 ऑगस्टला गौराईचं (Jyeshtha Gauri) आगमन झाल्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी नातेवाईक, प्रियजन, मित्र मंडळींना घरी प्रत्यक्ष बोलवण्यापेक्षा ऑनलाईन दर्शनाला बोलवण्याचा विचार करत असाल तर आजच त्यांना Gauri Ganpati Invitation व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस (WhatsApp Messages) , एमएमएस (SMS) च्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत यंदाच्या गणेशोत्सवासाठी ऑनलाईन दर्शनासाठी (Ganeshotsav Online Darshan) आमंत्रित करण्यासाठी हे मेसेज फॉर्वर्ड करा.

घरगुती गणेशोत्सवामध्ये यंदा शनिवार, 22 ऑगस्टला गणपतीचं आगमन होईल. 25 ऑगस्टला गौराईचं आगमन आणि 26 ऑगस्टला पूजन होएऐल. माहेरवाशिणींसाठी गौराईचा सण म्हणजे धम्माल असते. पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुमच्या मैत्रिणींसोबत ऑनलाईन माध्यमातून भेटणं, गौरी-गणपतीचं दर्शन घेणं सोयीचं ठरणार आहे. Ganeshotsav 2020: यंदा गणेशोत्सव हरितालिका, ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन कधी? जाणून घ्या तारखा!

गौरी -गणपती 2020 च्या आमंत्रणासाठी खास मेसेजेस

नमुना 1:

Ganpati Invitations| File Photo

सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्याकडे श्रीगणराय आणि गौराईचे आगमन होणार आहे. तरी यंदा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन लिंकवर भेट द्यावी ही नम्र विनंती!

गणरायाची प्राणप्रतिष्ठा - 22 ऑगस्ट, सकाळी 9 पासून

गौराई पूजन - 26 ऑगस्ट

ऑनलाईन लिंक -

नमुना 2:

Ganpati Invitations| File Photo

गणपती बाप्पा मोरया

दरवर्षी प्रमाणे यंदाही 22 ऑगस्ट दिवशी आमच्याकडे गणरायाचं तर 25 ऑगस्ट दिवशी गौराईचं आगमन होणार आहे. तरीही आपण ऑनलाईन माध्यमातून बाप्पाचा आशिर्वाद घ्यावा ही विनंती!

वेळ-

लिंक -

गौरी पूजन तारीख- वेळ :

नमुना 3:

Gauri-Ganpati Invitations | File Photo

आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश गणरायाचे आगमन होणार आहे. आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.

आपले नम्र,

तारीख :

ठिकाण :

वेळ : ..

गणपती बाप्पा हा संकटमोचक आहे. मग यंदा त्याला घरी आणल्यानंतर त्याच्याकडे कोरोनातून सार्‍या जगाची मुक्ती होवो अशी कामना करताना अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. यंदा नातेवाईकांना, मित्रमंडळींना घरी बोलावण्याचा हट्ट टाळा आणि व्हॉट्सॅप, फेसबूकच्या माध्यमातून जगभर विखुरलेल्या तुमच्या मित्रमंडळींना, प्रियजनांना ऑनलाईन दर्शनाला आमंत्रित करून कोरोना व्हायरस आरोग्य संकट दूर ठेवण्यास मदत करा!