Happy Workers Day 2020: आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Greetings, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून देऊन व्यक्त करा कामगारांबद्दलचा आदर
Happy Workers Day 2020 (File Photo)

1 मे, राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा केला जातो, याच दिवसाची अजून एक खासियत आहे, ती म्हणजे याच दिवशी ‘जागतिक कामगार दिन’ (International Workers Day) सुद्धा साजरा होतो. 17 व्या शतकाच्या मध्यापासून औद्योगिक क्रांती सुरु झाली, त्यानंतर जगभरात झालेल्या कामगार चळवळींच्या गौरवासाठी 1 मे रोजी कामगार दिवस पाळला जातो. जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 1891 पासून 1 मे हा कामगार दिन पाळण्यात येत आहे. भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात 1 मे 1923 रोजी साजरा करण्यात आला.

औद्योगिक क्रांती झाली, लोकांना कामे मिळू लागली मात्र त्याचबरोबर कामगारांची पिळवणूकही सुरु झाली. त्यावेळी कामगारांचे कामाचे तास 15 होते. हे तास कमी करणे तसेच इतर अनेक मागण्यासाठी जगभरात चळवळी उभा राहिल्या. अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलिया मध्ये. इथल्या कामगारांना न्याय मिळाल्यानंतर अमेरिकेतही कामगारांच्या मागण्या जोर धरू लागल्या. याबाबत 1 मे 1886 रोजी कामगारांचे मोर्चे निघाले होते. त्यानंतर इथल्या कामगारांच्या मागण्याही मान्य झाल्या व अशा प्रकारे जगभरात 1 मे रोजी कामगार दिवस साजरा होऊ लागला. तर अशा या कामगार दिनाचे औचित्य साधून, तुम्हीही तुमचे मित्र, कुटुंब, किंवा जवळच्या लोकांना Messages, Greetings, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.

कामगार दिनाच्या शुभेच्छा -

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान

शेतकर्‍यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील

एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान

कामगार दिनाच्या शुभेच्छा!

Happy International Workers Day 2020

सातत्याने नवनिर्मितीमध्ये गुंतलेल्या

सर्व शेतकरी, कष्टकरी व कामगार बंधूंना

कामगार दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

Happy International Workers Day 2020

एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे

सावध असा तुफानाची हीच सुरवात आहे

कामगार आहे मी, तळपती तलवार आहे

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy International Workers Day 2020

जगतो जगासाठी आयुष्यभर, मायमातीचा आधार

नाही कुणाचा लाचार, माझ्या भूमितला कामगार

कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

Happy International Workers Day 2020

जो मेहनतीने त्रासाला दूर करतो

रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो

तो प्रत्येकजण 'मजदूर' असतो

कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy International Workers Day 2020

(हेही वाचा: Happy Maharashtra Day 2020 Messages: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश, Wishes, Greetings, WhatsApp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा हा गौरवदिन!)

दरम्यान, ज्या मागण्यांसाठी संपूर्ण जगभर कामगारांनी आंदोलन केले त्यामध्ये 8 तासांचा कामाचा दिवस, लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी, महिला कामगारांच्या कामावर मर्यादा, रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम, कायद्याने साप्ताहिक सुट्टी, कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा, समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य, अशा काही महत्वाच्या मागण्या होत्या.