(Photo Credits: Google Doodle)

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 (International Women's Day 2023) आज जगभरात साजरा केला जात आहे. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल डूडल (International Women's Day 2023 Google Doodle) बनवून महिला दिन साजरा करत आहे. गूगलचे आजचे होमपेज ओपन करताच एक सुंदर असेल चित्र पहायला मिळते. तेज डूडल असून हे डूडल (Google Doodle) महिलांची विविध क्षेत्रातील भरारी, संघर्ष आणि परस्परांप्रती असलेला सन्मान, मदत आणि समर्थन प्रणालीही दर्शवते. दरम्यान, दरवर्षी, जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीची ओळख करून देण्यासाठी जगभरात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

महिला दिनानिमित्त आजचे डूडल कलाकार (Doodle Artist) अॅलिसा विनान्स (Alyssa Winans) यांनी बनवले आहे. डूडलविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, यंदाच्या महिला दिनाची थीम ही 'महिलांना समर्थन' या विषयावर होती. त्यामुळे माझ्या एकूण आयुष्यात महिलांनी मला जो पाठिंबा दिला. त्यावर मी अधिक लक्ष केंद्रीत करु शकले. (हेही वाचा, Women's Day 2023 Messages: जागतिक महिला दिनानिमित्त Wishes, Quotes, Images, Greetings शेअर करुन आपल्या आयुष्यातील खास महिलांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!)

आजच्या डूडलमध्ये दिसणाऱ्या महिलांना त्यांच्या हक्कासांठी आंदोलन करणाऱ्या, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, मातृत्व आणि अशा अनेक विषयांवर एकमेकांना भक्कम आधार देणाऱ्या महिला म्हणून आपण पाहू शकता.

महिला दिन म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा एक दिवस आहे, जो महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करतो. तसेच जगभरातील महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करतो. पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन 1911 मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून त्याचे महत्त्व आणि लोकप्रियता वाढली आहे. ही आता अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून ओळखली जाते आणि जगभरातील लाखो लोक रॅली, मोर्चे आणि इतर कार्यक्रमांसह साजरा करतात.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम वर्षानुवर्षे बदलत असते, परंतु ती नेहमीच लिंग समानतेचा प्रचार आणि महिला सक्षमीकरणावर केंद्रित असते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठळकपणे दर्शविल्या जाणार्‍या काही प्रमुख मुद्द्यांमध्ये लिंग-आधारित हिंसा समाप्त करणे, लैंगिक वेतनातील तफावत कमी करणे, महिलांचे आरोग्य आणि कल्याण यांना चालना देणे आणि नेतृत्वाच्या पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे यांचा समावेश आहे.