
Women's Day 2023 Messages: दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाला समर्पित आहे. महिलांना सन्मान देण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा विशेष दिवस साजरा करण्यामागचा उद्देश त्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे हा आहे. महिला आपल्या जीवनात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावतात. कधी आई म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी पत्नीच्या रूपात. या दिवशी जगभरातील महिलांचे जीवन सुधारणे, त्यांची जागरूकता वाढवणे अशा अनेक विषयांवर भर दिला जातो.
आजच्या बदलत्या काळानुसार हा दिवस साजरा करण्याची पद्धतही बदलली आहे. महिलांचा सन्मान करून त्यांना समाजात समान दर्जा मिळावा हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. जागतिक महिला दिनानिमित्त Wishes, Quotes, Images, Greetings शेअर करुन आपल्या आयुष्यातील खास महिलांना मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणा क्षणांची साथ,
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!!

उत्तुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावे
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आईच्या वात्सल्याला सलाम
बहिणीच्या प्रेमाला सलाम
मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजातील लोकांना महिलांबद्दल जागरुकता मिळावी, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि समाजात पसरलेली विषमता दूर करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे.