Happy International Women's Day Marathi Messages and Wishes: महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ आज (8 मार्च) जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. खरंतर जागतिक महिला दिन हा प्रथम न्युयॉर्क येथे 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा करण्यात आला. परंतु 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनांनुसार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. सध्याच्या बदलत्या काळानुसार महिला या कोणत्याही गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करतात. महिला सध्या फक्त घरातील कामे न करता ऑफिस, राजकरण किंवा समाजातील एखादा मुद्दा असो त्यासाठी लढा देण्यासाठी पुढे सरसावलेल्या दिसून येतात. तसेच पुरुषांच्या बरोबरोनी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा ठाम निर्णय महिलांनी घेतल्याने त्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहत आहेत. त्यामुळे स्त्रीयांना समजात मान आणि सन्मान देणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असल्याचे म्हटले जाते.
जागतिक महिला दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे मुलगा किंवा मुलगी यांच्यामधील भेदभाव दूर करण्याच्या दृष्टीने साजरा केला जातो. तर आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images, Facebook च्या माध्यमातून शुभेच्छा देत करा 'स्री' शक्तीचा सन्मान!(International Women's Day 2020: यंदाचा आंतररष्ट्रीय महिला दिन जाणून घ्या कोणत्या थीम वर जगभर साजरा केला जाणार)
International Women's Day
1910 साली जर्मन देशाच्या क्लारा जेटकिन (Clara Zetkin) या महिलेने जागतिक महिला दिन साजरा करण्याचा विचार जगासमोर मांडला. त्यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला 17 देशातील 100 पेक्षा अधिक महिलांनी सहमती दर्शवली. त्यानंतर जगभरात महिला दिनाच्या सेलिब्रेशनची सुरुवात झाली. त्यावेळेस जागतिक महिला दिनाची सुरुवात करणे, यामागे महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा प्रमुख उद्देश होता.