International Women's Day 2020 (Photo Credits: Pixabay)

International Women's Day 2020 Theme:  दरवर्षी 8 मार्च हा जगभरात International Women's Day म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या दिवसाचं सेलिब्रेशन वेगवेगळ्या थीमवर सजलेलं असतं. यंदाचा जागतिक महिला दिन I am Generation Equality: Realizing Women's Rights या थीम अंतर्गत साजरा केला जाणार आहे. जगात पहिल्यांदा महिला दिन 1909 साली साजरा करण्यात आला होता. पुढे 1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाने एका थीमच्या आधारे महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासूनच जागतिक महिला दिनाच्या सेलिब्रेशनला अधिकृत मान्यता देखील देण्यात आली आहे.

1910 साली जर्मन देशाच्या क्लारा जेटकिन (Clara Zetkin) या महिलेने जागतिक महिला दिन साजरा करण्याचा विचार जगासमोर मांडला. त्यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला 17 देशातील 100 पेक्षा अधिक महिलांनी सहमती दर्शवली. त्यानंतर जगभरात महिला दिनाच्या सेलिब्रेशनची सुरुवात झाली. त्यावेळेस जागतिक महिला दिनाची सुरुवात करणे, यामागे महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा प्रमुख उद्देश होता.

8 मार्च दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याला कशी झाली सुरूवात? 

त्यानंतर 1911 साली 19 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला. याला प्रथमच जगभरातील लाखो महिला आणि पुरुषांनी पाठिंबा दर्शवला. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला महिलांना मर्यादीत हक्क होते. राजकीय आणि काम करण्याच्या अधिकारावर अनेक बंधने होती. त्यामुळे पहिल्या महायुद्धादरम्यान, महिला दिन या युद्धाविरुद्धचे प्रतीक बनला. म्हणून रशियन महिलांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी महिला दिन साजरा करण्याचे ठरवले.

1917 साली रशियन महिलांनी केलेल्या निषेधानंतर त्यांना मताधिकार देण्यात आला. फेब्रुवारी 1918 साली युनायटेड किंग्डम मध्ये 30 महिलांना ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची संपत्ती होती त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. इतिहासात 1975 हे साल 'रेड लेटर ईअर' (Red Letter Year) म्हणून ओळखले जाते. याच वर्षी युनायटेड नेशनने 'जागतिक महिला दिना'ला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला. त्यानंतर 1976 ते 1985 हे महिलांचे दशक म्हणून ओळखले जावू लागले. 2011 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मार्च हा महिना 'वुमन्स हिस्ट्री मन्थ' (Women's History Month) असल्याचे घोषित केले. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अनेक ठिकाणी महिलांसाठी तो दिवस खास केला जातो.