
Happy Nurses Day 2022 : जगभरात 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस (International Nurses Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने परिचारिका म्हणून सेवा देणार्यांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली जाते. दरवर्षी हा नर्स डे एका विशिष्ट थीम वर साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा इंटरनॅशनल नर्स डे 2022 हा "Nurses: Make a Difference."या थीम वर साजरा केला जाईल. मागील दीड वर्ष कोरोना संकटादरम्यान प्रत्येकालाच आरोग्य यंत्रणेचं महत्त्व पटलं आहे. प्रभावी आरोग्ययंत्रणेसाठी डॉक्टरांच्या जोडीने नर्सने देखील तितक्याच तळमळीने काम करणं गरजेचे असते. मग यंदाच्या नर्स डे निमित्त तुम्ही देखील परिचारिका म्हणून सेवा देणार्यांना थॅक्स म्हणण्यासाठी ही काही ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images सोशल मीडीयात WhatsApp, Instagram, Twitter, Facebook द्वारा शेअर करू शकता.
रुग्णांच्या सेवेचा पाया रोवणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन म्हणजेच 12 मे हा दिवस जगभरात ‘नर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल या इसवी सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी केली होती. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. Happy Nurses Day Quotes in Marathi: जागतिक परिचारिका दिनानिमित्त Wishes, Images द्वारे सुंदर विचार शेअर करुन व्यक्त नर्सेसबद्दल कृतज्ञता!
नर्स डे च्या शुभेच्छा






नर्सिंग क्षेत्राकडे त्या काळात तितकेसे प्रतिष्ठेने पाहिले जात नव्हते. मात्र त्यांनी सर्व सामाजिक अडथळ्यांकडे दुर्लक्ष करत 1851 मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे 1853 मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं