Happy International Nurses Day Quotes: दरवर्षी 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन साजरा केला जातो. रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जगातील प्रत्येक परिचारिकेचा सन्मान करण्याचा हा दिवस. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याचे ठरले. म्हणून 12 मे हा दिवस हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. 12 मे 1820 रोजी इटलीमध्ये फ्लोरेन्स यांचा जन्म झाला. धनाढ्य कुटुंबात वाढूनही फ्लोरेन्स नायटिंगल यांनी आपले जीवन रुग्णसेवेसाठी सपर्मित केले. आधुनिक सुश्रुषा पद्धती विकसित केल्या. रात्ररात्र त्या हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत. त्यामुळे त्यांना 'लॅम्प लेडी' असेही म्हटले जात असे.
नर्सिंग क्षेत्राकडे त्या काळात तितकेसे प्रतिष्ठेने पाहिले जात नव्हते. मात्र त्यांनी सर्व सामाजिक अडथळ्यांकडे दुर्लक्ष करत 1851 मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे 1853 मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं. (Happy Nurses Day 2021 Wishes: जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा Images, Messages, WhatsApp Status द्वारा देत या फ्रंटलाईन वॉरियरला म्हणा Thanks)
मागील वर्षापासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या काळात आरोग्यसेवकांचे महत्त्व अधोरेखित झाले. स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या नर्सेस प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नर्सेस डे चा चांगला योग जुळून आला आहे. तर आपल्या ओळखीच्या, नात्यातल्या नर्सेंससोबत हे सुंदर विचार Wishes, Images द्वारे सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम वर शेअर करुन त्यांचे आभार माना.
Nurses Day Quotes:
1. एकासाठी काळजी करणे म्हणजे प्रेम, सगळ्यांसाठी काळजी करणे म्हणजे नर्सिंग
3. स्वत: ला ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्यांच्या सेवेत स्वत:ला झोकून देणे- महात्मा गांधी
4. काळजी, सेवा आणि मदत करण्याच्या वृत्तीमुळेच प्रत्येक नर्स नर्सिंगकडे आकर्षित होते- Christina Feist-Heilmeier
5. काळजी घेणे हे नर्सिंगचे सार आहे- जीन वॉटसन
13 ऑगस्ट, 1919 रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचं निधन झालं. नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदानामुळे त्यांच्या नावाने पुरस्कारही दिला जातो. नर्सिंग क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने गौरवण्यात येतं.