Happy Nurses Day 2021 Wishes: जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा Images, Messages, WhatsApp Status द्वारा देत या फ्रंटलाईन वॉरियरला म्हणा Thanks
Happy Nurses Day 2021 | File Images

Happy Nurses Day 2021 Messages In Marathi: जगभरात दरवर्षी 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन अर्थात International Nurses Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस Florence Nightingale यांचा जन्मदिन देखील आहे. आरोग्यसेवेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. नर्सेस डे चं औचित्य साधत रूग्णसेवेचं कर्तव्य बजावणार्‍या प्रत्येकीच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. सध्या कोरोना संकटामध्ये या परिचारिकांचं योगदान विशेष आहे. आरोग्यसेवेचा कणा असलेल्या या परिचारिका आपलि अहोरात्र सेवा देत असल्याने आपण कोविड 19 वैश्विक संकटाचा सामना करू शकत आहे. मग त्यांच्या या सेवाभावी वृत्तीला सलाम करण्यासाठी आज सोशल मीडियात तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, फेसबूक मेसेजेस द्वारा खास मराठमोळे मेसेजेस, शुभेच्छा संदेश, HD Images, Greetings द्वारा शेअर करून यंदाचा नर्सेस डे 2021 साजरा करू शकता. (Happy Nurses Day Quotes in Marathi: जागतिक परिचारिका दिनानिमित्त Wishes, Images द्वारे सुंदर विचार शेअर करुन व्यक्त नर्सेसबद्दल कृतज्ञता!).

1965 साली The International Council of Nurses (ICN) यांच्याकडून नर्सेस डे साजरा करण्यास सुरूवात झाली. यंदा 2021 सालचा नर्सेस डे "Nurses: A Voice to Lead - A vision for future healthcare" याथीम वर साजरा केला जाणार आहे. कोविड 19 संकटामुळे आपल्याला सगळ्यांनाच त्यांचं महत्त्व अनेक अर्थाने समजलं असेल. परिचारिकांच्या मदतीशिवाय आरोग्यक्षेत्र यावर नियंत्रण मिळवू शकलं नसतं. म्हणून आज त्यांना थॅक्यू म्हणत त्या करत असलेल्या अथक सेवेसाठी आपली कृतज्ञता नक्की व्यक्त करा.

जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा 

Happy Nurses Day 2021 | File Images

कोरोना संकटकाळात दिवसरात्र सेवा  देणार्‍या

सार्‍या परिचारिकांना सलाम!

हॅप्पी नर्स डे!

Happy Nurses Day 2021 | File Images

सलाम तुमच्या सेवाभावी वृत्तीला

परिचारिका दिनाच्या शुभेच्छा!

Happy Nurses Day 2021 | File Images

नर्स डे निमित्ताने आरोग्य सेवेचा कणा असणार्‍या

सार्‍या परिचारिकांना सलाम

हॅप्पी नर्स डे!

via GIPHY

Happy Nurses Day 2021 | File Images

नर्स डे 2021 निमित्त कोविड संकटकाळात

'कोविड योद्धा' म्हणून कर्तव्य बजावणार्‍या

प्रत्येक रणरागिणीला कृतज्ञतापूर्वक अभिवादन

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या शुभेच्छा!

Happy Nurses Day 2021 | File Images

कोरोना संकटकाळात नर्सेस यांनी आपल्या घरापासून दूर राहून आणि जीव धोक्यात घालून कोरोनाशी सामना करण्यासाठी काम केले आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोना संक्रमणावर आपण काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकलो यामध्ये सहाजिकच डॉक्टरांसोबतच फ्रंटलाईन वर्क र्स म्हणून लढणार्‍या परिचारिकांचा देखील मोलाचा वाटा आहे.