International Monkey Day 2019: माकडांबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
प्रातिनिधिक प्रतिमा (photo credit : Healthline)

International Monkey Day 2019: माकडांना माणसांचा पूर्वज असे म्हटले जाते. नरवानर गणाच्या 'अँथ्रोपॉयडिया' या उपगणातील प्राण्यांस माकड असे म्हणतात. निसर्ग वैज्ञानिक जॉन रे यांनी बॅबून सोडून इतर सर्व सपुच्छ नरवानरांस 'माकड' व पुच्छरहित नरवानरास 'कपी' अशी संज्ञा दिली आहे. साधारणत: माकडांचे वर्णन 2 गटांमध्ये केले जाते. पहिला प्रकारामध्ये आशिया व आफ्रिकामधील माकडे येतात. या माकडांना 'प्राचीन जगातील माकडे', असे म्हटले जाते. तर दुसऱ्या प्रकारामध्ये दक्षिण अमेरिकेमधील माकडे येतात त्यांना 'नवीन जगातील माकडे', असं म्हटलं जातं. 14 डिसेंबर 2000 पासून हा दिवस 'जागतिक माकड दिन' (International Monkey Day 2019) म्हणून साजरा केला जातो. आज या दिवसाचे औचित्य साधून आपण या लेखातून माकडांविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात. (हेही वाचा - पश्चिम बंगालमधील एकारुखी गावात सापडला 2 डोकी असलेला दुर्मिळ साप; चमत्कार समजून लोकांनी पाजलं दुध)

माकडांविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

  • माकडाला माणसांचा पूर्वज असं म्हटलं जात. मुळात माकड व माणसाचा DNA जवळ-जवळ 98% समान असतो. तसेच माकडांना 32 दात असतात.
  • माकड हा प्राणी फळे, फुले याशिवाय किडे व लहान सरपटणाऱ्या प्राण्यांनाही खातो. आतापर्यंत माकडांच्या 264 प्रजातींचा शोध लावला गेला आहे. माकडांच्या सर्वात जास्त प्रजाती ब्राझीलमध्ये आढळतात.
  • 2000 पासून 14 डिसेंबर हा World Monkey Day म्हणून साजरा केला जातो.
  • विशेष म्हणजे Howler जातीच्या माकडांचा आवाज 5 किलोमीटरपर्यंत ऐकला जाऊ शकतो. तसेच मादी माकड आपल्या पिल्लांना 134 ते 237 दिवस आपल्या पोटामध्ये वाढवते आणि त्यानंतर पिल्लाला जन्म देते. मानवाप्रमाणे माकडांमध्येदेखील कावीळ आणि TB सारखे आजार होतात.
  • अंतराळात सर्वात अगोदर जाणारा प्राणी म्हणजे माकड होय. मानवाने अंतराळात जाणाऱ्या यानामध्ये माकडाला पाठवले होते. या माकडाचे नाव Albert II असे होते. या माकडाने 1949 मध्ये पृथ्वीपासून 133 किलोमीटर उंचीवरप्रवास केला होता.
  • आणखी एक विशेष म्हणडे माकडं चेहऱ्यावरचे हावभाव, वेगवेगळे आवाज व वेगवेगळ्या हालचाली यांच्यासाहाय्याने एकमेकांशी संवाद साधतात.
  • माकडांचा IQ 174 एवढा असतो.

अमेझॉनच्या जंगलामध्ये माकडांच्या 81 प्रजाती आढळतात.  माकडांचे आयुष्यमान 20 ते 30 वर्षे असते. माकड हा झाडावर वास्तव्य करणारा प्राणी आहे. तसेच दुसऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तो नेहमी समुहात राहतो.