तुम्ही दोन तोंडाच्या सापाविषयी ऐकलं असले. परंतु, दोन तोंडाव्यतिरिक्त दोन डोकी असलेला साप तुम्ही कधी पाहिला नसेल. पश्चिम बंगालमधील (West Bengal) बेल्दा जंगल (Belda Forest) परिसरातील एकारुखी (Ekarukhi Village) गावात दोन डोक्याचा साप आढळला आहे. हा साप पाहुन एकारुखी गावातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे हे लोक दैवी चमत्कार समजून या सापाला दुध पाजत आहेत.
एकारुखी गावातील लोक जंगलात जात असताना त्यांना हा दोन डोकी असलेला साप आढळला. त्यानंतर या सापाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. यातील अनेकजणांनी या सापाला दूध पाजलं. तसेच काही लोकांनी यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच वन विभागाचे अधिकारी एकारूखी गावात पोहचले. (हेही वाचा - Tik Tok Video: टिक टॉकवर बॉलिवूड अभिनेत्र्यांनाही मागे टाकले 'या' छोट्या मुलीने)
West Bengal: A two-headed snake found in the Ekarukhi village of Belda forest range. (10.12.19) pic.twitter.com/jLD4mPWhv8
— ANI (@ANI) December 10, 2019
हा साप पाहण्यासाठी एकारुखी गावाच्या आजूबाजूच्या गावांतील काही नागरिकांनीही गर्दी केली होती. त्यामुळे या दुर्मिळ सापाच्या संरक्षणासाठी वन विभाग खबरदारी घेत आहेत. मागील वर्षी अमेरिकेत नॉर्दन व्हर्जिनियामधील एका घराच्या अंगणात दोन डोक्यांचा कॉपरहेड स्नेक आढळला होता. निसर्गात दोन डोक्यांचे साप अगदी दुर्मिळ स्वरुपात आढळतात. सध्या पश्चिम बंगालमध्ये आढळलेल्या सापाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.