Tik Tok Video: टिक टॉकवर बॉलिवूड अभिनेत्र्यांनाही मागे टाकले 'या' छोट्या मुलीने
Saniya Ahmad (PC - Twitter)

Tik Tok  Viral Video: सोशल मीडियावरील लोकप्रिय टिक टॉक अॅपवर (Tik Tok App) अनेकजण वेगवेगळ्या स्वरुपाचे व्हिडिओ टाकत असतात. यातील अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. परंतु, काही व्हिडिओमधून मात्र काही लोकांचे टॅलेंट दिसून येते. सध्या या अॅपवर एका 3 वर्षाच्या मुलीचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. या मुलीचं नाव सानिया अहमद, (Saniya Ahmad) असं आहे.

सानियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. अनेकजण तर सानियाच्या टीक टॉक व्हिडिओची वाट पाहुनचं असतात. सानिया नेहमी विविध गाण्यांवर टिक टॉक व्हिडिओ बनवत असते. यात ती गाण्यानुसार, अगदी मन मोहून टाकणारे हावभाव करते. (हेही वाचा - Miss Universe 2019: स्विमसूट राऊंडमध्ये पाय घसरून पडली स्पर्धक; Watch Video)

सानियाचे टिक टॉक व्हिडिओ पाहुन ती भविष्यात मोठी अभिनेत्री होणार हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे बॉलिवूडचे अनेक कलाकार या छोट्या टिक टॉक क्वीनचे दिवाणे आहेत. सानियाने अगदी कमी वयात सर्वांची मने जिंकली आहेत. सानिया टिक टॉक व्यतिरिक्त Vigo Video वरही अॅक्टीव्ह असते. विगो व्हिडिओवरही तिचे अनेक फॉलोवर्स आहेत.