Halloween 2019: भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये जसा पितृपक्ष पाळून पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. त्याच धर्तीवर ख्रिस्ती बांधव हॅलोवीन साजरा करतात. दरवर्षी 31 ऑक्टोबर दिवशी हॅलोविन (Halloween) साजरं केलं जातं. आजकाल सोशल मीडिया, हॉलिवूड सिनेमा, वेबसीरीज याच्या माध्यमातून हॅलोवीन बाबत भारतीयांच्या मनातही उत्सुकता वाढली आहे. अत्यंत विचित्र, भूता-खेतांच्या वेशभूषेत अनेकजण तयार होईन या हॅलोविन पार्टीमध्ये सहभागी होतात असं पाहिलं असेल. मग या 'हॅलोविन' सेलिब्रेशनची नेमकी सुरूवात कधी, कशी कुठे झाली? हे देखील नक्की जाणून घ्या. आज भारतामध्येही हॅलोविन पार्टी यांचं सेलिब्रेशन केलं जातं. बॉलिवूड सेलिब्रिटी ते सामान्य नागरिक यामध्ये सहभागी असतात.
भारतामध्येही अगदी कवचित काही मंडळी हॅलोविन सेलिब्रेशन करतात. मात्र अनेकदा त्यामागील नेमकी भावना, इतिहास ठाऊक नसल्याने त्याचे अंधानुकरण केले जाते. म्हणून जाणून घ्या जगभरातील हॅलोविन सेलिब्रेशन बद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी
- हॅलोविन सेलिब्रेशन हे मूळतः इंग्लंड आणि आर्यलंड येथील आहे. 19 व्या दशकात या प्रथेला सुरूवात झाली. आणि पुढे जगाच्या विविध भागात जसे आयरिश लोकं पसरत गेले तसे याचे सेलिब्रेशनही आपले रूप आणि रंग बदलत आहे.
- युरोपीन देशात प्रामुख्याने सॅल्टिक जातीचे लोकांची अशी धारणा आहे की हॅलोवीन दरम्यान मेलेल्या व्यक्तींचे आत्मे त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतात. 'सॅमहॅन' असा ओळखला जाणारा हा दिवस त्यांच्या पितरांच्या भेटीचा असल्याने ते शेतीच्या कापणीमध्ये मदत करायला येतात त्यामुळे भूतांची- प्रेतांची वेशभूषा करण्याची प्रथा सुरू झाली.
- हॅलोवीन या शब्दाची फोड केल्यास तुम्हांला Hallows’ Eve यामध्येच त्याचा अर्थ समजतो. संत लोकांच्या स्मराणाची रात्र असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरच्या पूर्वसंध्येला त्याचं सेलिब्रेशन होतं. 1 नोव्हेंबरला चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. तर 2 नोव्हेंबर पर्यंत त्याचं सेलिब्रेशन सुरू असतं.
- अमेरिकेमध्येही हॅलोवीन पार्टीचं मोठ्या स्वरूपात आयोजन केलं जातं. तेथे भोपळ्यांना भयावह वाटणार्या आकृतीमध्ये कापून त्यामध्ये दिवे सोडले जातात. याला 'जॅक ओ लॅटन्स' (Jack-o'-Lantern) असं देखील म्हटलं जातं. पहिला असा दिवा Turnips नावाच्या कंदात बनवला गेला होता.
- हॅलोविन सेलिब्रेशन मध्ये काळा आणि नारंगी रंग प्रामुख्याने वापरला जातो. नारंगी रंग हा शक्तीचं प्रतिक आहे. तसेच युरोपात ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळा आणि उन्हाळा यादरम्यानचा काळ असल्याने निसर्गातही सारी वृक्ष, पानं पिवळी, नारंगी रंगाची झालेली असतात. तर काळा रंग भय, मृत्यू यांचं प्रतिक आहे. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या सेलिब्रेशनमध्ये नारंगी आणि काळ्या रंगाचा वापर केला जातो.
- 1993 साली सुमारे 836 Lb चा भोपळा खास हॅलोविनसाठी पिकवला गेला होता. Norm Craven यांच्या नावावर त्याचा रेकॉर्ड आहे.
- ख्रिस्मस नंतर हॅलोविन हा पाश्चिमात्य देशात सर्वात मोठा कमर्शिल हॉलिडे असतो.
हॅलोवीन ही सुमारे 6000 वर्ष जुनी प्रथा आहे. आता हळूहळू त्याचं लोण भारतामध्येही पसरायला सुरूवात झाली आहे. मग यंदा तुम्हीदेखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार असाल तर हॅलोवीन संबंधी या प्रथा आणि सेलिब्रेशनचं नक्की भान ठेवा.