Independence Movement Heroes: आज भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. सकाळी पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडले. दरवर्षी पेक्षा यंंदाच्या सोहळ्याचे स्वरुप साधे असले तरी उत्साह तितकाच कायम आहे. भारताला मिळालेलंं स्वातंंत्र्य ही तब्बल 100 हुन अधिक वर्ष हजारो-लाखो क्रांतिकारकांंच्या बलिदानाचंं, त्यागाचं, लढ्याचं प्रतिक आहे. त्यामुळे आज या महत्वाच्या दिवसाचे सेलिब्रेशन करताना देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतुन सोडवण्यासाठी लढा दिलेल्या स्वातंंत्र्य सैनिकांंचे स्मरण करणे आवश्यक आहे. या सैनिकांच्या लढतानाच्या पद्धती आक्रमी- शांत अशा नानाप्रकारच्या असु शकतात पण त्यांंचा हेतु एकच होता आणि तो म्हणजे भारत मातेचे स्वातंंत्र्य, या लढ्यात सहभाग घेतेलेले किंंबहुना नेतृत्व केलेले काही मराठमोळे नेते आता आपण पाहणार आहोत.
मराठमोळे स्वातंत्र्यसैनिक
वीर दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, 28 मे 1883 ; मृत्यू : मुंबई, 26 फेब्रुवारी 1966) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. सावरकर हे क्रांतिकारक, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी चळवळीचे समर्थक देखील होते. सावरकर एकमेव असे स्वातंत्र्य-योद्धा होते ज्यांना 2-2 जन्मठेपेची शिक्षा झाली असून ती त्यांनी पूर्ण केली आणि पुन्हा राष्ट्र जीवनात सक्रिय झाले. हिंंदु महासभेची स्थापना, काळ्या पाण्याची शिक्षा, समुद्रात उडी मारण्याचे धैर्य या व अशा अनेक बाबींंमुळे सावरकर प्रसिद्ध आहेत, त्यांंचे कार्य सध्या वादाचा विषय झाल्याचा मुद्दा वेगळाच.
बाळ गंंगाधर टिळक
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक रत्नांपैकी एक रत्न असलेले आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंह गर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली झाला होता. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण,बहिष्कार, स्वराज्य ही चतूःसुत्री देणारे, केसरी मराठा सारखे वृत्तपत्र स्थापन करणारे, गणेशोत्सवाची नांंदी करणारे, परकीय सत्तेशी लढताना सामाजिक रुढी परंपरांंना सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करणारे टिळक हे मराठी माणसाची शान वाढवणारे आहेत यात दुमत नाही.
क्रांंतिसिंंह नाना पाटील
क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट 3, 1900 - डिसेंबर 6, 1976) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य मुख्यतः सांगली सातारा या परिसरामध्ये होते. प्रारंभीच्या काळात त्यांंच्यावर सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. 1920 ते 1942 या काळात नाना 8-10 वेळा तुरुंगात गेले. 1942 ते 46 या काळात ते भूमिगतच होते.
श्रीपाद अमृत डांगे
श्रीपाद अमृत डांगे (जन्म : करंजगाव-नासिक, 10 ऑक्टोबर 1899; मृत्यू : 22 मे 1991 ) ह्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 1925 साली स्थापना केली. धनगर समाजात जन्मलेले कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात. भारतीय कामगार चळवळीचे ते अध्वर्यू समजले जातात. त्यांनी भारतावरच्या ब्रिटिश राजवटीत आयुष्याची 13 वर्षे तुरुंगात काढली. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. डांगे हे अप्रतिम वक्ते होते
वासुदेव बळवंत फडके
वासुदेव बळवंत फडके (जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, 4 नोव्हेंबर 1845 ; मृत्यू : एडन,येमेन, 17 फेब्रुवारी 1883 ) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. 1870 च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली. फडके यांंची सशस्त्र क्रांती हा अभ्यासाचा विषय आहे.
दरम्यान त्या काळात चुल- मुल सांंभाळतानाच महिलांंनी सुद्धा पुढाकार घेउन स्वातंंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. सावरकरांंच्या पत्नी माई सावरकर, पंंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले यांंसारख्या नावांंचा त्यात समावेश आहे. या शिवाय अनेक अन्य नेत्यांनी, क्रांंतिकारकांंनी सामाजिक, धार्मिक बाजुवर सुद्धा थोर काम केले आहे. या सर्वांना आजच्या या महत्वाच्या दिनी विनम्र अभिवादन आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!