फाल्गुन पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमेला (Hutashani Purnima) होळी पेटवल्यानंतर दुसरा दिवस हा धुलिवंदनाचा (Dhulivandan) असतो. धुलिवंदन म्हणजे धुळवड (Dhulvad) साजरा करण्याचा दिवस. होळीचा आनंद रंगांची उधळण करत या दिवशी साजरा केला जातो. भारतामध्ये आबालवृद्ध धूळवड साजरी करण्यासाठी रंगांची उधळण करतात. यंदा कोरोनाचं संकट आटोक्यात असल्याने कठोर निर्बंधांशिवाय हा सण साजरा करण्याची मुभा आहे. त्यामुळे तुम्ही देखील प्रियजणांसोबत रंगांची बरसात करत धुलिवंदन साजरी करणार असाल तर सोशल मीडीयातही आप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना या रंगबेरंगी सणाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), स्टिकर्स, मेसेजेस, ग्रीटिंग्स, वॉलपेपर, शुभेच्छापत्र Facebook, Twitter, Instagram द्वारा शेअर करत दिवसाची सुरूवात करा.
होळीचा सण आनंदाचा, ऋतूमानातील बदलांचा स्वीकार करण्याचा असतो. होळीपासून पुढे हवामानात हळूहळू उष्णता वाढायला सुरूवात होते. मग त्याचा आनंद तुमच्या नातेवाईकांसोबत जरूर घ्या. मागील दीड दोन वर्ष सारेच लॉकडाऊन असल्याने एकमेकांना भेटू शकत नव्हते मात्र यंदा ते बंधन नसेल. हे देखील नक्की वाचा: Holi 2022 Nail Care Tips: नखांना होळीच्या विषारी रंगांपासून वाचवण्यासाठी 5 सोप्या पद्धती .
धुळवडीच्या शुभेच्छा
धूळवडीच्या निमित्ताने महाराष्ट्रात घरा घरामध्ये पुरणपोळीचा बेत केला जातो. होळी पेटवताना पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो. तर धुळवडीला अनेक ठिकाणी थंडाई बनवण्याची पद्धत आहे.
सणाच्या रीतीभाती असल्या तरीही ग्लोबल वार्मिंग आणि वातावरणीय बदल लक्षात घेता आता पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे घरच्या घरीच इको फ्रेंडली रंग बनवत धूळवडीचा आनंद साजरा करा. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करण्यास मदत होणार आहे.