Photo Credit: Pixabay

Holi 2021 Eco-Friendly Colours: होळीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, हा सण लोक मोठ्या थाटामाटात साजरे करतात. या दिवशी लोक एकमेकांमधील जुने रूसवे फुगवे विसरुन रंग लावतात आणि होळीचा सण आनंदाने साजरा करतात. यावर्षी होलिका दहन 28 मार्च रोजी रंगणार आहेत, तर 29 मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाईल. होळीचा सण जवळ येत असतानाच बाजार रंगीबेरंगी रंगांनी भरते ,पण बाजारामध्ये आढळणारे बहुतेक रंग रासायनिक आणि केमिकलयुक्त असतात ज्यामुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होऊ शकते.यामुळे एलर्जी, डोळ्यांची जळजळ, पुरळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.अशा परिस्थितीत नैसर्गिक रंगांसह होळी खेळणे हा एक सुरक्षित पर्याय असू शकतो आणि यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही. होळीसाठी, आपण सहजपणे आपल्या घरी होळीचे नैसर्गिक रंग बनवू शकता,यासाठी आपण या व्हिडिओची मदत देखील घेऊ शकता. (Holi 2021 Skin Care Tips: रंगपंचमीच्या रंगांपासून कसे कराल त्वचेचे संरक्षण? जाणून घ्या सोप्या टिप्स)

अशा प्रकारे बनवा नैसर्गिक रंग

रात्रभर पाण्यात पलाश फुले भिजवा, यामुळे आपणास होळीसाठी एक सुंदर केशरी रंग तयार करण्यास मदत होईल. लोकप्रिय मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण पलाशच्या फुलांनी होळीही खेळत असत. टेसूच्या फुलांचा रंग होळीचा पारंपारिक रंग मानला जातो.

पारिजात फुले पाण्यात भिजवून नारिंगी रंग बनवता येतात. एक लिटर पाण्यात एक चिमूटभर चंदन टाकून केशरी रंग तयार करता येतात .

याशिवाय तुम्ही होळी खेळायला गुलाल म्हणून कोरडे लाल चंदन वापरू शकता. हा लाल लाल रंग त्वचेसाठी चांगला आहे.

जासवंदीची फुले सुकवून घ्या व त्याचे चूर्ण तयार करा.परिपूर्ण लाल रंग देण्यासाठी, त्यात थोडे पीठ घालून त्याचे प्रमाण वाढवा.

सिंदुरियाची बिया लाल रंगाची असतात.अशा परिस्थितीत आपण होळी खेळण्यासाठी कोरडा आणि ओला लाल रंग बनवू शकता.

बेसन च्या पिठामध्ये थोडी हळद घालून तुम्ही सेंद्रिय पिवळा रंग तयार करू शकता.

दोन चमचे लाल चंदन पावडर घ्या आणि उकळवा. त्यात पाच लिटर पाणी घाला. हे आपल्याला पिचकारीसाठी एक चांगला लाल रंग देईल.

घरी आपण या गोष्टींमधून नैसर्गिक आणि पर्यावरणास अनुकूल रंग बनवू शकता. घरी बनवलेल्या नैसर्गिक रंगांनी होळी खेळल्यास तुमच्या त्वचेला आणि केसांना त्रास होणार नाही. यासह घरी बनवलेल्या रंगांमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही.