Holi 2021 Skin Care Tips: रंगपंचमीच्या रंगांपासून कसे कराल त्वचेचे संरक्षण? जाणून घ्या सोप्या टिप्स
Photo Credit : Pexels

अवघ्या काही दिवसांवर होळी सण आला आहे.सर्व वाइट गोष्टींचे दहन करणारा दिवस म्हणजे होळी(Holi). होलिका दहन झाल्यावर धुळवड म्हणजेच रंगपंचमी (Rangpanchami) साजरी केली जाते. या दिवशी सगळीकडे रंगांची उधळण आपल्याला पहायला मिळते. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत  सगळेच जण रंगपंचमी खेळणे एन्जॉय करत असतात. पण ही रंगपंचमी( Dhulvad) खेळत असताना आपल्यातील बऱ्याच जाणांना खास करुन महिलांना जास्त काळजी असते ती त्वचेची काळजी कशी घ्यायची याची. पण तुमच्या याच समस्येवर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत जे तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरतील. (Holi 2021 Date: यंदा कोणत्या तारखेला आहे होळी? कधी कराल होलीका दहन? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व )

कशी घ्याल काळजी 

केसांना रंग आणि हानिकारक रसायनांपासून वाचवण्यासाठी केसांना तेल चांगले लावा, जेणेकरून आपले केस खराब होणार नाहीत

दोन थेंब लव्हेंडर तेल, एक थेंब गुलाब तेल आणि दोन-तीन थेंब लिंबाचा रस दोन चमचे बदाम तेलात मिसळून आपल्या केसांना लावू शकता, यामुळे आपल्या केसांना पोषण आणि संरक्षण मिळेल.

होळी खेळण्यापूर्वी वेणी घालण्यास विसरू नका, कारण असे केल्याने डोक्याच्या त्वचेत रंग येण्याची शक्यता असते, ज्यामुळे आपल्याला खाज सुटणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

अतिनील किरण आणि सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी होळी खेळण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.

पुरुषांनी आपल्या दाढीची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे, म्हणून त्यांनी होळीच्या आधी नारळ तेल, बदाम तेल लावण्यास विसरू नये.

रंग खेळूण झाल्यावर आपण हळद क्लीन्सरने आपला चेहरा देखील धुवू शकता.

आपल्या संपूर्ण शरीरावर मध आणि शिया बटरसह मॉइश्चरायझर लावा, यामुळे शरीराची त्वचा मऊ होईल आणि त्यामध्ये ओलावा कायम राहील.

संपूर्ण रंग काढल्यावर आणि आंघोळ झाल्यावर पुरुषांनी दाढीवर दोन ते तीन थेंब यलंग-यलंग (कैनेन्गा)  तेल लावा.