Hartalika Teej Pujavidhi & Muhurt: श्री गणरायाचे आगमन होण्याआधी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. कुमारिका आणि महिला हे व्रत करतात. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वती शिव प्राप्तीसाठी सखी ला तपश्चर्येला घेऊन गेली होती म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात. हरितालिकेच्या व्रतात शिव-पार्वतीचे (Shiv - Parvati) पूजन केले जाते. पौराणिक कथांनुसार पार्वतीने शंकराची आराधना करून शंकराला आपल्या वराच्या रुपात प्राप्त केले होते. म्हणून मनासारख्या वराच्या प्राप्तीसाठी कुमारिका तसेच सौभाग्यवती स्त्रिया सुद्धा हे व्रत करतात. यंंदा 21 ऑगस्ट रोजी हे व्रत केले जाणार आहे या निमित्ताने हरितालिका व्रत कसे करावे? या व्रताचा यंंदाचा मुहुर्त आणि पूजाविधी जाणून घेउयात.
श्रावण सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकराची पूजा करता आली नाही अशा महिलांनी हरतालिकेला पूजा केल्यास त्यांना बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते अशी ही मान्यता आहे. हरितालिका व्रता च्या निमित्त्ताने संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करून दुसऱ्या दिवशी गणेशाच्या पुजनानंंतर उपवास सोडायचा असतो.
हरतालिका पुजा मुहुर्त आणि तिथी
हरतालिका तिथी: 21 ऑगस्ट 2020
हरतालिका तिथी प्रारंंभ: 21 ऑगस्ट सकाळी 02.14 वाजता
हरतालिका तिथी समाप्ती: 21 ऑगस्ट रात्री 11.04 PM पर्यंत.
दरम्यान संंध्याकाळी 6 ते 9 यावेळेत प्रदोष काळ असणार आहे.
हरितालिका पूजाविधी
-या दिवशी अंगाला तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छा जागी चौरंग ठेवुन भोवती रांगोळी काढावी.
-चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे.
-उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा.
-समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
- सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे.
-अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा.
- सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.
- पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी.
हरतालिकेच्या व्रताच्या निमित्त कोकण प्रांंतात खास सोहळा असतो. सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. यात 24 तासांचा उपवास आणि 36 तासाचे जागरण सुद्धा करतात त्यामुळे रात्री विविध खेळ खेळून रात्र जागविली जाते. दुसरे दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखविला जातो. यानंतर या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यानंतरच उपवास सोडला जातो.