Hartalika Vrat 2019 Importance: भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिकेचे व्रत जाते. या दिवशी पार्वतीने शंकराची आराधना करून शंकराला आपल्या वराच्या रुपात प्राप्त केले म्हणून हे व्रत केले जाते. शिव प्राप्तीसाठी पार्वती आपल्या सख्यांना घेऊन व्रत करण्यास गेली होती. म्हणून हे व्रत कुमारिकांसोबत सौभाग्यवती स्त्रिया करतात. असंही म्हणताता की वर्षभर ज्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकराची पूजा करता आली नाही त्यांनी हरतालिकेला पूजा केल्यास त्यांना बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते.
या व्रतामागची पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, पार्वती मागच्या जन्मी कुमारिका असताना भगवान शंकरासाठी हे व्रत केले होते. ज्यामुळे तिला या जन्मी पती म्हणून शंकर भगवान प्राप्त झाले. या दिवशी संपूर्ण एक दिवस उपवास केला जातो. या दिवशी पार्वतीने शंकराच्या पिंडीवर 16 पत्री अर्पण केली होती, ज्यामुळे तिला शंकर भगवान वर म्हणून प्राप्त झाले. त्याच 16 पत्री महिला किंवा कुमारिका शंकराच्या पिंडीवर हरतालिके दिवशी अर्पण करतात. हीच 16 पत्री का असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर या 16 पत्रींचे वेगवेगळे महत्व आहे. जाणून घ्या सविस्तर
1. बेलपत्र- शिवतत्व आणि शक्ती चे प्रतीक
2. आघाडा- गणपती आणि शक्ती चे प्रतीक
3. मालती- शिव आणि शक्ती चे प्रतीक
4. दुर्वा- गणपती आणि शक्ती चे प्रतीक
5. चंपक- महाकाली चे प्रतीक
6. करवीर- शक्ती चे प्रतीक
7. बदरी- शिव आणि शक्ती चे प्रतीक
8. रुई- हनुमान आणि शक्ती चे प्रतीक
9. तुळस- विष्णु आणि शक्ती चे प्रतीक
10. मुनिपत्र- निर्गुण चे प्रतीक
11. दाडिमी- शिव आणि शक्ती चे प्रतीक
12. धोतरा- शिव आणि शक्ती चे प्रतीक
13. जाई- शक्ती चे प्रतीक
14. मुरुबक- महाकाली चे प्रतीक
15. बकुळ- गणपती आणि शक्ती चे प्रतीक
16. अशोक- ब्रह्म आणि शक्ती चे प्रतीक
हे व्रत महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा थोडी वेगळी असली तरी शिवपार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते.