यंदाचा 21 जून हा दिवस खास ठरणार आहे. सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरस आजाराशी लढत असताना रविवार, 21 जून रोजी जगात तीन वेगवेगळ्या गोष्टी साजऱ्या होत आहेत. फादर्स डे, योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस (World Music Day 2020). 21 जून, म्हणजे जागतिक संगीत दिनाची सुरुवात, 1982 मध्ये फ्रान्समध्ये झाली, तत्कालीन सांस्कृतिक मंत्री श्री. जॅक लो यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. फ्रान्समध्ये या दिवसाला ‘फेटे डे ला म्यूसिक’ असे म्हटले जाते. सर्वात प्रथम लोकप्रिय फ्रेंच संगीत दिग्दर्शक ‘मॉरीश फ्लेरेट’ व ‘जॅक लँग’ यांनी हा दिवस साजरा करण्याची प्रथा फ्रान्समध्ये सुरु केली. खरेतर फ्रान्समधील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती संगीताशी जोडली गेली आहे. मग ते वाद्य असो वा गायन, शास्त्रीय असो किंवा सुगम, देशी असो वा परदेशी. 21 जून 1982 रोजी या संगीत दिनाची अधिकृत घोषणा झाली व आता हा दिवस संपूर्ण जगात साजरा होत आहे.
भारतालाही संगीताची फार मोठी परंपरा आहे. अनेक उत्तम गायक, संगीतकार भारताला लाभले आहेत. या दिवसाचे औचित्य साधून जगभरात अनेक कार्यक्रम साजरे होतात. फ्रांसमध्ये तर तब्बल महिनाभर संगीतविषयक कार्यक्रमांची रेलचेल असते. संगीत हा आपल्या प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य घटक आहे. संगीताने आपले जीवन इतके व्यापले आहे की, व्यक्तीचा मूड हा संगीतामुळे बदलतो, बिघडतो किंवा ठीकही होतो. (हेही वाचा: संगीत ऐकल्याने तुमच्या शरीरावर होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!)
तर अशा या जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून, आपले मित्रमंडळी, कुटुंबीय, जवळचे लोक यांना Wishes, Greeting, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून द्या शुभेच्छा
शून्यातून आरंभ, पुन्हा शून्यातच जाणे, हाच प्रवास आयुष्याचा, बनुनी एक सुरेल गाणे
जागतिक संगीत दिना’च्या शुभेच्छा!
‘संगीत है शक्ती ईश्वर की... हर स्वर में बसे है राम, रागी जो सुनायें रागिणी... रोगी को मिले आराम...’
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
संगीत एक अशी कला आहे जी कानात जाऊन सरळ हृदयाला भिडते...
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
संगीत क्षेत्रातील साधनेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या सर्व साधकांना, ‘जागतिक संगीत दिना’च्या शुभेच्छा!
संगीतावर प्रेम करणाऱ्या आणि संगीतासाठी आयुष्य वेचणाऱ्या सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!
बेभान भावना, छेडीले सूर, अलगद उमटली धून... हृदयाच्या कंपनातून
विणल्या सुरावटी, धुंद झाले जग, अलगद उतरले अश्रू... नयनकाठ सोडून
जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
दरम्यान, आदिम संगीत, लोकसंगीत, जनसंगीत, धर्मसंगीत, कलासंगीत व संगम-संगीत ह्या सहा संगीतकोटी स्थूल मानाने मानल्या जातात व त्यांना भारतीय संगीतात प्रदीर्घ परंपरा आहे. ध्वनीच्या विशिष्ट रचनेला स्वरवर्णादी क्रियेने (विशिष्ट स्वर समूहाने) रंगकत्व येते. अशा ध्वनीमालिकेला ‘राग’ म्हणतात. स्वरांतून विशिष्ट सूक्ष्म शक्तीची निर्मिती होऊन त्यांतून सूक्ष्म रंग प्रगट होतात. यालाच ‘स्वरांतून रंगकत्व निर्माण होणे’, असे म्हणतात. सप्तस्वरांचा उच्चार विशिष्ट पद्धतीने, उदा. तीव्र, मध्यम किंवा कोमल केल्यावर विशिष्ट रागाची निर्मिती होते.